AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबत डान्स, पंजाबी गाण्यावर थिरकली दोघांची जोडी

भारताचा आघाडी फिरकीपटू आणि आरसीबीचा मुख्यं गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. आता तो पत्नी धनश्री सोबतच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

VIDEO: फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबत डान्स, पंजाबी गाण्यावर थिरकली दोघांची जोडी
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 9:27 PM
Share

बई : भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू आणि सध्या आयपीएलमध्ये (IPL 2021) आरसीबी संघाच्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबत एका पंजाबी गाण्यावर थिरकला आहे. चहल पती-पत्नी सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. धनश्री प्रोफेशनल डान्सर असल्याने विविध डान्स स्टाईलसाठी ती प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरुन डान्सचे नवनवे प्रकार ती प्रेक्षकांना दाखवते. आता धनश्रीसोबत पती युझवेंद्रही डान्स करताना दिसत आहे.

धनश्री वर्मा ही अनेकदा पाश्चिमात्य संगीतावर ठेका धरत असते. पण यावेळी तिने प्रसिद्ध पंजाबी गाणं ‘क्या बात हे’  यावर डान्स केला आहे. गायक हार्डी संधूचं हे गाणं देशभरात प्रसिद्ध असून या गाण्यावर आता चहल जोडीही नाचताना दिसत आहे.  तर या कमाल डान्सचा व्हिडीओ तुम्हीही एन्जॉय करा…

पती मैदानावर तर पत्नी सोशल मीडियावर HIT

चहलला आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याला संघात न घेतल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच चहलही प्रत्येक सामन्यानंतर आपल्या कामगिरीने निवड समितीला सडेतोड उत्तर देत आहे. चहलने आतापर्यंत झालेल्या आरसीबीच्या सामन्यात प्रत्येकवेळी अप्रतिम कामगिरी केली आहे. नुकत्याच राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यातही (RCB vs RR) त्याने 4  षटकात फक्त 18 रन देत 2 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे युएईमध्ये खेळलेल्या 24 आय़पीएल सामन्यात 4 वेळा चहलने सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे.

तर दुसरीकडे पत्नी धनश्री वर्माचं एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला 15 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. धनश्री इंस्टाग्रामवर देखील तितकीच अॅक्टिव्ह असते. प्रत्येक दिवसाची खबरबात ती आपल्या प्रेक्षकांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. अनेक गाण्यांना रिक्रिएट करून त्या गाण्यावर उत्तम डान्स करण्यासाठी धनश्री प्रसिद्ध आहे. धनश्रीने 2014 सायली डी वाय पाटील डेंटल कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आहे.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच चहलची पोलखोल केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा तिच्या डान्सचा व्हिडीओ देखील तुफान लोकप्रिय झाला होता.

व्यवसायाने डेंटिन्स, कोरिओग्राफर, व्हिडीओला लाखोंचे संख्येने व्ह्यूज

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय. धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

हे ही वाचा

VIDEO: रोहित शर्माचं नवं चँलेज, प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करुन चाहत्यांना सांगितलं ओळखायला, तुम्ही ओळखू शकता का?

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

(RCB Cricketer Yuzvendra chahal and Wife dhanashree verma Dance video on punjabi song kya baat hai went viral)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.