IND vs AFG Test : टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी विजय, अफगाणिस्तानचा डाव आणि 300 धावांनी धुव्वा

India vs Afghanistan Test Match Result : टीम इंडियाने अफगाणिस्तानवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्धचा हा दुसरा कसोटी विजय ठरला आहे. पदार्पणवीर मानव सुथार भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक आणि एकूण 7 विकेट्स मिळवल्या.

IND vs AFG Test : टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी विजय, अफगाणिस्तानचा डाव आणि 300 धावांनी धुव्वा
Washington Sundar Risbhab Pant IND vs AFG
Image Credit source: Bcci
| Updated on: Jun 08, 2026 | 4:36 PM

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याचं आयोजन हे न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिला डाव 8 विकेट्स गमावून 564 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारताने अफगाणिस्तानला पहिल्या डावात 152 धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. तर दुसऱ्या डावात 112 रन्सवर ऑलआऊट करत भारताने विजय मिळवला. डेब्युटंट मानव सुथार भारताच्या विजयात बॉलिंगने सर्वोत्तम योगदान दिलं. मानवने एकूण 7 विकेट्स मिळवल्या.

सामन्यात काय झालं?

कर्णधार शुबमन गिल याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी पहिल्या डावात दोघांनी शतकं आणि तिघांनी अर्धशतकं झळकावलं. या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी पहिवला डाव हा 127 ओव्हरमध्ये 8 आऊट 564 रन्सवर घोषित केला. टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी शतक झळकावलं. शुबमनने 126 तर केएलने 10 धावा केल्या. तसेच साई सुदर्शन आणि ऋषभ पंत या दोघांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद 52 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही छोटेखानी खेळी करत भारताला 550 पार पोहचवण्यात हातभार लावला. अफगाणिस्तानासाठी मोहम्मद सलीम साफी याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या.

अफगाणिस्तानचा पहिला डाव

अफगाणिस्तानला पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. भारताने अफगाणिस्तानला 58.4 ओव्हरमध्ये 152 रन्सवर ऑलआऊट केलं. अफगाणिस्तानसाठी रहमत शाह याने सर्वाधिक 60 रन्स केल्या. तर कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी याने 20 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून डेब्युटंट मानव सुथार याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. प्रसिध कृष्णा याने तिघांना आऊट केलं. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवत अफगाणिस्तानचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.

दुसऱ्या डावात फिरकीचा कहर

क्रिकेट चाहत्यांना सामन्यातील तिसऱ्या आणि अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. भारताने अफगाणिस्तानला 35.5 ओव्हरमध्ये 112 रन्सवर ऑलआऊट केलं. अफगाणिस्तानसाठी सेदीकुल्लाह अटल याने सर्वाधिक 42 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरुबाझ याने 24 आणि रहमत शाहने 13 धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदर याने दुसऱ्या डावात 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादव याने तिघांना आऊट केलं. तर मोहम्मद सिराज आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us