AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS, 2nd ODI | ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 10 विकेट्सने धमाकेदार विजय

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

IND vs AUS, 2nd ODI | ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 10 विकेट्सने धमाकेदार विजय
| Updated on: Mar 19, 2023 | 5:48 PM
Share

विशाखापट्टणम | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवत जोरदार कमॅबक केलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला. या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेल मार्श याने नाबाद 66 आणि ट्रेव्हिस हेड याने नाबाद 51 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडिया अवघ्या 26 ओव्हरमध्ये 117 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या चोघांना भोपळाही फोडता आला नाही.

अक्षर पटेल याने शेवटपर्यंत नाबाद राहत 29 धावा जोडल्या. ज्यामुळे टीम इंडियाला 100 धावांचा टप्पा पूर्ण करता आला. रविंद्र जडेजा 16 धावा करुन बाद झाला. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 13 धावा केल्या. या व्यतिरक्त केएल राहुल याने 9, हार्दिक पंड्या 1 आणि कुलदीप यादव याने 4 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर सिन एबोट याने 3 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

तिसरा सामना निर्णायक

दरम्यान आता 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम मालिका जिंकेल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये या तिसऱ्या सामन्यात चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान