AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN कसोटीदरम्यान मैदानात माज दाखवणारा शाकिब विराटला नडला? दोघांमधील व्हिडीओ समोर

ind vs ban : भारत आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. यामधील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि शाकिब अल हसन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

IND vs BAN कसोटीदरम्यान मैदानात माज दाखवणारा शाकिब विराटला नडला? दोघांमधील  व्हिडीओ समोर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 21, 2024 | 7:08 PM
Share

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर टीम इंडियाने आपल पकड मिळवली आहे. सामन्याचा आजचा तिसरा दिवस संपला असून बांगलादेश दुसऱ्या डावामध्ये 158-4 धावांवर आहे. बांगलादेशला कसोटी सामना जिंकण्यासाठी आणखी 357 धावांची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला सहा विकेटची गरज आहे. सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियालर व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि शाकिब अल हसन यांचा व्हिडीओ समोर आला आहे. मैदानावर आपल्या चुकीच्या वर्तनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या शाकिब अल हसन आणि विराटमध्ये नेमकी काय चर्चा झाली.

विराट कोहली कसोटी सामन्यामध्ये काही खास प्रदर्शन करू शकलेला नाही. पहिल्या डावात 06धाला त दुसऱ्या डावात 17 धावांवर आऊट झाला. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट बॅटींग करत असताना विराट आणि शाकिब यांच्यात नेमकी काय चर्चा झाली की शाब्दिक बाचाबाची झाली? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  विराट नॉन-स्ट्राईकला असताना त्याने नुकतीच ओव्हर टाकून गेलेल्या शाकिब अल हसनला बोलला की, काय मलिंगा झाला आहेस, यॉर्करवर यॉर्करवर टाकत आहेस. यावर शाकिबही हसला

शाकिब अल हसन याने अनेकदा मैदानात राडा घातल्याचं पाहिलं असेल. एका प्रकरणामध्ये त्याच्यावर दोन वर्षांची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याचे अनेकवेळा मैदनात वाद होत असतात. पंचांनी आऊट दिलं नाही म्हणून त्याने स्टम्प उखडले होते. रागीट स्वभावाचा शाकिब विराटसमोर हसत होता.

पाहा व्हिडीओ:-

बांगलादेश प्लेइंग 11 : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...