IND vs ENG | कुलदीप यादवचा पंजा, इंग्लंड नेस्तानाबूत, टीम इंडिया मजबूत स्थितीत

| Updated on: Mar 07, 2024 | 2:08 PM

Kuldeep Yadav 5th Wickets | कुलदीप यादव याने इंग्लंडला पाचव्या कसोटीत जोरदार पंच देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. बेन स्टोक्स कुलदीपची पाचवी शिकार ठरली.

IND vs ENG | कुलदीप यादवचा पंजा, इंग्लंड नेस्तानाबूत, टीम इंडिया मजबूत स्थितीत
Follow us on

धर्मशाला | टीम इंडियाच्या कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकीसमोर इंग्लंडने शरणागती पत्कारली आहे. धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट अकादमीच्या स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडची आश्वासक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर कुलदीप यादव याने बेन डकेट याला 27 धावांवर आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकी जोडीने ठराविक अंतराने झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. तसेच कुलदीप यादव याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट करत पाचवी विकेट पूर्ण केली. कुलदीपच्या कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ ठरली.

बेन स्टोक्स आऊट झाल्याने इंग्लंडची स्थिती 6 बाद 175 अशी स्थिती झाली. इंग्लंडने आपल्या 3 विकेट्स या 175 धावांवर गमावल्या. रवींद्र जडेजा याने जो रुट याला 26 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. तर त्याआधी कुलदीपने अनुक्रमे बेन डकेट 27, ओली पोप 11, झॅक क्रॉली 79 आणि जॉनी बेयरस्टो याला 29 धावांवर आऊट करुन 4 विकेट्स पूर्ण केल्या.

आर अश्विन याचा इंग्लंडला दणका

कुलदीप यादव याच्या पंचनंतर 100 वा कसोटी सामना खेळत असलेल्या आर अश्विन याने इंग्लंडला दणका दिला. अश्विनने इंग्लंडला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. अश्विनने आधी टॉम हार्टली याला डेब्युटंट देवदत्त पडीक्कल याच्या 6 धावांवर आऊट केलं. तर त्यानंतर मार्क वूड याला भोपळाही फोडू दिला नाही. रोहित शर्मा याने स्लिपमध्ये मार्क वूड याचा अप्रतिम कॅच घेतला.

टीम इंडियाचा इंग्लंडला दे धक्का

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.