IND vs NZ : शिवम दुबेची वादळी खेळी, नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान

India vs Netherlands, 1st Innings : टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी ठिकठाक खेळी केली. मात्र शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत भारताला 193 धावांपर्यंत पोहचवलं.

IND vs NZ : शिवम दुबेची वादळी खेळी, नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान
Shivam Dube and Hardik Pandya Team India
Image Credit source: Bcci x Account
Sanjay patil | Updated on: Feb 18, 2026 | 10:09 PM

ऑलराउंडर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या स्फोटक आणि झंझावाती भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने साखळी फेरीतील आपल्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 193 धावा केल्या आहेत. भारताला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात शिवम दुबे याने प्रमुख भूमिका बजावली. तर हार्दिक पंड्या यानेही निर्णायक योगदान दिलं. शिवम-हार्दिक व्यतिरिक्त तिलक वर्मा आणि इशान किशन या दोघांनीही धावा जोडल्या. त्यामुळे आता टीम इंडिया हा सामना किती धावांनी जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाचा बॅटिंगचा निर्णय

कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन सलामी जोडी मैदानात आली. अभिषेकने पुन्हा निराशा केली. अभिषेक सलग तिसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर इशान आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताला उभारी दिली. इशान आणि तिलक या दोघांनी 39 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक 31 धावावंर बाद झाला. इशाननेही 18 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाची 9 ओव्हरमध्ये 3 आऊट 69 अशी स्थिती झाली.

Loading...

तिलकनंतर शिवम दुबे सूर्याची साथ देण्यासाठी मैदानात आला. सूर्या आणि शिवमने चौथ्या विकेटसाठी 27 चेंडूत 41 धावांची भागीदारी केली. सूर्याच्या खेळीचा 34 धावांवर शेवट झाला. सूर्याने या खेळीत 1 सिक्स आणि 2 लगावले.

शिवम-हार्दिकचा तडाखा

सूर्या आऊट झाल्यानंतर शिवमची साथ देण्यासाठी ऑलराउंडर हार्दिक पंड्या मैदानात आला. शिवम आणि हार्दिक या दोघांनी भारताला 193 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा जोडल्या. दोघांनी 35 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. शिवम आऊट झाल्याने ही सेट जोडी ब्रेक झाली. शिवमने 31 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 66 रन्स केल्या. तर हार्दिक पंड्या याने निर्णायक 30 धावा जोडल्या. हार्दिकने या खेळीत 3 सिक्स लगावून 18 धावा मिळवल्या.  तर रिंकूने 1 सिक्ससह नाबाद 6 धावांचं योगदान दिलं. नेदरलँड्ससाठी लोगन वॅन बीक याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. लोगनने टीम इंडियाच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आर्यन दत्त याने 2 विकेट्स मिळवल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us