AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st Test : इंडिया-न्यूझीलंड पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द, टॉसही होऊ शकला नाही

India vs New Zealand 1st Test Day 1 Rain : पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. पावसामुळे हा सामान होणार की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

IND vs NZ 1st Test : इंडिया-न्यूझीलंड पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द, टॉसही होऊ शकला नाही
rain ind vs nz 1st test day1 m chinnaswamy stadiumImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 16, 2024 | 3:32 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं आधीपासूनच स्पष्ट होतं. तसेच या सामन्यात उर्वरित 4 दिवसही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने तिकीट काढून स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांच्या पदरी घोर निराशा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याने बीसीसीआयने पावसाचा अंदाज घेऊनच सामन्यांचं आयोजन करावं, अशी संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

दीर्घ वेळ प्रतिक्षा आणि मग जे व्हायचं तेच झालं

नियोजित वेळेनुसार सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस सुरु असल्याने टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर बीसीसीआयकडून वेळोवेळी माहिती देण्यात आली. मात्र पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. त्यानंतर पुन्हा पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे दुसरं सत्रही वाया गेला. त्यामुळे टी ब्रेक घेण्यात आला. मात्र टी ब्रेकनंतर बीसीसीआयने पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं.

दुसऱ्या दिवसाबाबत बीसीसीआयने काय सांगितलं?

दरम्यान आता दुसऱ्या दिवशी सामन्याला सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तसेच 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आता दुसऱ्या दिवशी वरुणराजाच्या कृपेमुळे सामना होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

पहिल्या दिवसाचं पावसाकडून पॅकअप

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...