IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वी फॅन्स भिडले, टीव्ही फोडण्यावरुन डिवचलं

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे.

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वी फॅन्स भिडले, टीव्ही फोडण्यावरुन डिवचलं
Indian and Pakistani Cricket fans
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 11:59 AM

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. तर टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क खरेदी केलेल्या क्रीडा वाहिन्यांनी नेहमीप्रमाणे ‘मौका… मौका…’ वाल्या जाहिराती प्रसारित केल्या आहेत. तर दोन्ही देशांचे चाहते सोशल मीडियावर या सामन्याची वातावरणनिर्मिती करत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. (IND vs PAK, T20 World Cup 2021 : Indian and Pakistani Cricket fans fight over Breaking TV after loosing match)

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघ जेव्हा भिडतात तेव्हा टीव्ही फोडण्यावरुन मिम्स, मेसेजस पाहायला मिळतात. कारण विश्वचषक स्पर्धेक भारताने पाकिस्तानला अनेकदा धूळ चारली आहे आणि त्यानंतर पाकिस्तानात अनेक ठिकाणी तिथल्या क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही फोडण्याचे प्रकार केले आहेत. याच टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहते पाकिस्तानी फॅन्सना नेहमी डिवचत असतात. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचे बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला पोहोचले आहेत, तर भारतातील भारतीय संघाचे मोठे चाहते सुधीर गौतम देखील दुबईला गेले आहेत.

भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दोन्हीकडच्या फॅन्समध्ये वाद झाला. टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सना डिवचलं. सुधीर गौतम म्हणाले की, चाचा यावेळीदेखील पाकिस्तानात टीव्ही फोडले जातील. यावर बशीर चाचा म्हणाले की, पाकिस्तान प्रत्येक वेळी टीव्ही का फोडेल? यावेळी टीव्ही भारतात फोडले जातील. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये एकत्र दिसणाऱ्या क्रिकेटच्या या दोन सुपर फॅन्समध्ये अशीच गंमतीदार भांडणे पाहायला मिळाली.

कधी आणि कुठे पाहता येईल हाय व्होल्टेज सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषकातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, 7 वाजता नाणेफेक होईल. टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 पाकिस्तान विरोधातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेच मॅचचे अपडेटस मिळतील. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या www.tv9marathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रौफ

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

India vs Pakistan, T20 World Cup LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

(IND vs PAK, T20 World Cup 2021 : Indian and Pakistani Cricket fans fight over Breaking TV after loosing match)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.