AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 1st Odi : युजवेंद्र चहलला श्रीलंका विरुद्ध मोठा विक्रम करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे.

IND vs SL, 1st Odi : युजवेंद्र चहलला श्रीलंका विरुद्ध मोठा विक्रम करण्याची संधी
Image Credit source: Yuzvendra Chahal Twitter
| Updated on: Jan 02, 2023 | 7:14 PM
Share

मुंबई : श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची (Sri Lanka Tour Of India 2023) 3 जानेवरीपासून सुरुवात होत आहे. या भारत दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध (IND vs SL T20I Series) टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मंगळवारी ऊभयसंघात टी 20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)  टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. (ind vs sl t 20i series team india yuzvendra chahal have chance to break bhuvneshwar kumar most wickets in short format by indian bowler)

चहलला टी 20 मध्ये भारतीय म्हणून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम करण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम भुवनेश्वरच्या नावावर आहे. युझवेंद्र या विक्रमापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भुवनेशवरच्या नावावर 90 विकेट्सची नोंद आहे. तर चहलच्या नावे 87 विकेट्स आहेत. श्रींलका विरुद्ध टीम इंडिया 3 टी 20 सामने खेळणार आहे. त्यामुळे चहलकडे 4 विकेट्ससाठी करण्यासाठी 3 सामन्यांचा वेळ आहे. त्यामुळे चहल भुवनेश्वरचा हा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

टी 20 आणि वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका

दसुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, कुशल मेंडिस (उपकर्णधार एकदिवसीय मालिका), भानुका राजपक्षे (फक्त टी 20 मालिकेसाठी), चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, वानिंदु हसारंगा (उपकर्णधार, टी 20 मालिका), आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे (फक्त एकदिवसीय मालिका), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो (फक्त एकदिवसीय मालिका), दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन, लाहिरु कुमारा आणि नुवान तुशारा (फक्त टी 20 सीरिजसाठी).

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.