IND vs ENG : ‘हिटमॅन’चा आणखी एक ‘हिट’ रेकॉर्ड, सलामी फलंदाज म्हणून गाठलं नव शिखर

भारतीय संघातील दिग्गज फलंदाज आणि सर्व फॉर्मेटमधील सलामीवीर रोहित शर्माच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. या रेकॉर्ड्समध्येच आणखी एक रेकॉर्ड वाढला आहे.

1/5
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत इतर भारतीय फलंदाजाच्या तुलनेत उत्तम कामगिरी करत आहे. या कामगिरीन्वये त्याने एक  एक दमदार रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

2/5
रोहितने सलामी फलंदाज म्हणून 11,000 धावा पूर्ण करत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने ही कामगिरी केली आहे. रोहितने  246 डावांत ही कामगिरी पार केली आहे. तो जगातील सर्वात जलदगतीने ही कामगिरी पूर्ण करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो.

3/5
याआधी सलामीवीर म्हणून खेळत सर्वात जलदगतीने 10 हजार धावाही रोहितनेच पूर्ण केल्या होत्या. पण त्यावेळीही रोहितचा क्रमांक दुसरा असून पहिला क्रमांक तेंडुलकरचा होता. तेंडुलकरने 214 तर रोहितने 219 डावात ही कामगिरी केली होती.

4/5
सलामीवीर म्हणून रोहितने 35 शतकं ठोकली आहेत. यामध्ये कसोटीत चार शतकं, टी-20 मध्ये चार शतकं आणि एकदिवसीय सामन्यात 27 शतकं समाविष्ट आहेत. तर संपूर्ण कारकिर्दीचा विचार करता रोहितने एकूण 40 शतकं ठोकली असून त्यातील कसोटीत सात, एकदिवसीय सामन्यात 29 आणि टी-20 मध्ये चार शतकं सामिल आहेत.

5/5
रोहित आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात आधी सलामी फलंदाज म्हणून 2009 च्या टी-20 विश्वचषकात मैदावर उतरला होता. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळला होता. 2013 पासून तो कायम सलामीवी म्हणूनच खेळू लागला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI