India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 1:41 PM

चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात उद्यापासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.   या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम ( M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित टेस्ट सीरिजमध्ये पराभव केलाय. यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. यामुळे भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. यानंतर टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपण इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे मालिकानिहाय वेळापत्रक पाहणार आहोत. (india vs england series 2021 full schedule matches venue timings dates squads test t20 odi india time)

कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने हे चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. यानंतर उर्वरित 2 सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मोटेरा हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. गेल्या वर्षी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले होते. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा डे – नाईट असणार आहे. ही सीरिज टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 5-9 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

दूसरी कसोटी | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 13-17 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

तिसरी कसोटी | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 24 ते 28 फेब्रुवारी | दुपारी 2 वाजून 30 मिनिटं.

चौथी कसोटी | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 4 ते 8 मार्च | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये 5 मॅचची टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमध्येच खेळण्यात येणार आहेत. कोरोना काळात खेळाडूंना अनावश्यक प्रवासाचा त्रास वाचावा, या उद्देशाने या मालिकेतील सर्व सामने हे एकाच स्टेडियममध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सीरिजमधील सामने 1 दिवसाच्या अंतराने खेळण्यात येणार आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

टीम इंडियाने आतापर्यंत सलग 5 वेळा टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे इंग्लंड विरुद्धची ही मालिका जिंकून टी 20 मालिका विजयाचा षटकार मारण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. टी 20 मालिका आटोपल्यानंतर अखेरीस वनडे सीरिज खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये 3 सामने खेळण्यात येणार आहे. या सर्व सामन्यांचं आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

दरम्यान आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त इशांत शर्मा आणि केएल राहुल, तसेच हार्दिक पंड्याचेही कमबॅक झालं आहे.

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच. संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

India vs England | विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

(india vs england series 2021 full schedule matches venue timings dates squads test t20 odi india time)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.