Ind vs NZ, Live 1st Test, Day 4 Score : चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावांपर्यंत मजल, 284 धावांचं लक्ष्य, भारताला 9 विकेट्सची आवश्यकता

| Updated on: Nov 29, 2021 | 11:46 AM

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.

Ind vs NZ, Live 1st Test, Day 4 Score : चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावांपर्यंत मजल, 284 धावांचं लक्ष्य, भारताला 9 विकेट्सची आवश्यकता
IND VS NZ

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने भारताला 345 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर न्यूझीलंडला 142.3 षटकांमध्ये सर्वबाद 296 धावांवरपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 7 बाद 234 धावांवर आपला डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

दरम्यान, दिवसाची अवघी 4-5 षटकं बाकी असताना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारताचा डाव घोषित केला आणि त्याचं फळ भारताला मिळालं आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 4 षटकात एका विकेटच्या बदल्यात 4 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 9 विकेट्सची तर न्यूझीलंडला 279 धावांची आवश्यकता आहे.

Key Events

न्यूझीलंडच्या सलामीराशिवाय इतर फलंदाज अपयशी

न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. काल सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

अक्षर पटेलचे सर्वाधिक बळी

भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 34 षटकात 62 धावा देत 5 बळी घेतले. त्याला रवी अश्विन 3, उमेश यादव 1 आणि रवींद्र जाडेजाने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Nov 2021 04:31 PM (IST)

    न्यूझीलंडला पहिला धक्का, विल यंग 2 धावांवर बाद

    न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने सलामीवीर विल यंगला 2 धावांवर असताना पायचित पकडलं. (न्यूझीलंड 3/1)

  • 28 Nov 2021 04:02 PM (IST)

    ऋद्धीमान साहाचं अर्धशतक

    भारतीय संघ अडचणीत असताना ऋद्धीमान साहाने संयमी अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावरला आहे. त्याने आतापर्यंत 123 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा फटकावल्या आहेत.

  • 28 Nov 2021 03:27 PM (IST)

    नवी दिल्ली

    उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले असले तरी ते सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत

    खासदार विनायक राऊत यांचा प्रकाश जावडेकर यांना टोला

  • 28 Nov 2021 03:27 PM (IST)

    पुणे 

    पुण्यात महाविकास आघाडीनं दोन वर्षे पुर्ण केल्याचा पेढा भरवून आनंदोत्सव केला साजरा,

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमेकांना भरवले पेढे,

    महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी सगळ्या पक्षांच्या बैठका सुरू झाल्यात,

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती,

    जर आकडे वाटपात समाधानकारक चर्चा झाली तरी पुण्यात युती होईल,

    प्रशांत जगतापांची माहिती ..

  • 28 Nov 2021 02:50 PM (IST)

    डोंबिवली

    खंबाळपाडा परिसरातील घटना

    जेवणाचे पैसे आमच्या दराने घे

    यावरुन वाद हॉटेल मॅनेजरला मारहाण करीत तोडफोड

    पंधरा ते 20 तरुणांनी केली माराहाण आणि तोडफोड

    सीसीटिव्ही आणि डीव्हीआर सोबत घेऊन गेले

    मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

  • 28 Nov 2021 02:20 PM (IST)

    भारताचा सातवा फलंदाज माघारी, श्रेयस अय्यर 65 धावांवर बाद

    भारताने सातवी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 65 धावांवर असताना टिम साऊथीच्या गोलंदाजीवर टॉम ब्लंडेलकडे झेल देत बाद झाला. (भारत 167/7)

  • 28 Nov 2021 12:42 PM (IST)

    भारताचा सहावा गडी माघारी, आर. अश्विन 32 धावांवर बाद

    लंचनंतर लगेच भारताने आणखी एक विकेट गमावली आहे. काईल जेमिसनने रवीचंद्रन अश्विनला (32) त्रिफळाचित केलं. (भारत 103/6)

  • 28 Nov 2021 11:17 AM (IST)

    भौगौलिक संसाधनांचं सरंक्षण करायला हवं: नरेंद्र मोदी

    मेघालयातील नदीचं पाणी इतक स्वच्छ आहे की तिथं नाव हवेवर तरंगतेय का काय असं चित्र पाहायला मिळतं. आपण आपल्या प्राकृतिक संसाधनांचा विकास आणि संरक्षण करायला हवा, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपण निसर्गाविरुद्ध वागल्यानंतर आपल्याला निसर्गाकडून फटका बसतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 28 Nov 2021 11:02 AM (IST)

    श्रेयस-अश्विनचा आक्रमक पवित्रा

    51 धावांमध्ये 5 विकेट गमावल्यानंतर मैदानात असलेल्या श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोघांनी 21, 22, आणि 23 व्या षटकात 5 चौकार वसूल केले आहेत.

  • 28 Nov 2021 10:53 AM (IST)

    न्यूझीलंडला चौथं यश, मयंक अग्रवाल 17 धावांवर बाद

    न्यूझीलंडला चौथं यश मिळालं आहे. टिम साऊथीने मयंक अग्रवालला 17 धावांवर असताना टॉम लॅथमकरवी झेलबाद केलं. (भारत 51/4)

  • 28 Nov 2021 10:49 AM (IST)

    भारताला पाचवा धक्का. रवींद्र जाडेजा शून्यावर बाद

    भारताने पाचवी विकेट गमावली आहे. टिम साऊथीने रवींद्र जाडेजाला पायचित पकडलं. जाडेजाला भोपळादेखील फोडता आला नाही. (भारत 51/5)

  • 28 Nov 2021 10:25 AM (IST)

    भारताला तिसरा झटका, अजिंक्य रहाणे 4 धावांवर बाद

    चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणेदेखील माघारी परतला आहे. एजाज पटेलने रहाणेला 4 धावांवर असताना पायचित पकडलं. (भारत 41/3)

  • 28 Nov 2021 10:15 AM (IST)

    भारताची खराब सुरुवात, चेतेश्वर पुजारा 22 धावांवर बाद

    सकाळच्या सत्रात भारताने अत्यंत खराब सुरुवात केली आहे. काईल जेमिसनने चेतेश्वर पुजाराला (22) टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केलं. (भारत 32/2)

Published On - Nov 28,2021 9:55 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.