AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs SL : धोनीचा ‘हुकमी एक्का’ श्रीलंकेच्या संघावर भारी, आकाश चोप्रा म्हणाला, ‘चमकते रहो दीपक!’

टीम इंडियाच्या विजयाचा खरा नायक ठरला तो दीपक चाहर.... संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर भारत सामना हरणार असं समीकरण झालेलं होतं परंतु त्याच वेळी मैदानात चाहरची एन्ट्री झाली आणि त्याने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

Ind vs SL : धोनीचा 'हुकमी एक्का' श्रीलंकेच्या संघावर भारी, आकाश चोप्रा म्हणाला, 'चमकते रहो दीपक!'
दीपक चाहर-भुवनेश्वर कुमार
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 21, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई :  संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील अष्टपैलू खेळाडू आणि धोनीचा हुकुमी एक्का असलेल्या दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) तीन विकेट्सने मात करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने घातली. सामन्यात एकवेळ अशी आली होती की भारताचा पराभव होईल असं वाटत होतं पण दीपकने सामन्याची सूत्रं हातात घेऊन सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रीलंकन संघाने भारताच्या प्रमुख खेळाडूंना बाद केलं पण एकटा दीपक श्रीलंकेवर भारी पडला. (India vs Sri Lanka 2nd ODI Cricket Fans Appriciate Deepak Chahar batting Performance)

टीम इंडियाच्या विजयाचा खरा नायक ठरला तो दीपक चाहर…. संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर भारत सामना हरणार असं समीकरण झालेलं होतं परंतु त्याच वेळी मैदानात चाहरची एन्ट्री झाली आणि त्याने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. चाहरने 69 धावा केल्या. चाहरने एकेरी दुहेरी धावा काढत घेत संधी मिळेल तसे आक्रमक शॉट्सही लगावले. भुवनेश्वर कुमारने त्याला उत्तम साथ दिली. याशिवाय सूर्यकुमार यादवने देखील अर्धशतकी खेळी करत आपली छाप सोडली. कुणाल पांड्या 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये मध्ये परतला. क्रुणाल पांड्याने 35 धावा केल्या.

धोनीची हुकमी एक्का

दीपक चहर आयपीएल संघात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत असलेला दीपक वेळोवेळी आपली छाप सोडतो. बऱ्याच वेळा बोलिंगमध्ये धोनीनं हुकमी एक्का म्हणून त्याचा वापर केला आहे. अगदी संघाला पाहिजे तेव्हा तो विकेट्स मिळवून देतो. चेन्नईकडून खेळत असताना चाहरवर बॅटिंगची तितकीशी वेळ येत नाही. परंतु आज त्याला संधी मिळताच त्याने बोलिंगबरोबर बॅटिंगमध्ये देखील कमाल करून दाखवली. टीम इंडियाच्या विजयाचं हे धोनी कनेक्शन मानलं जातंय.

पायाचे स्नायू दुखावले गेले पण विजय मिळेपर्यंत खेळपट्टीवरुन हलला नाही!

सामन्यादरम्यान चाहरच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. पण तरीही खेळपट्टीवर तळ ठोकत भारतीय संघाला विजय मिळेपर्यंत तो विचलित झाला नाही. त्याच्या खेळीने सोशल मीडियावर त्याचं खूपच कौतुक होतंय.  ‘विजयाचा हिरो’, ‘चमकते रहो दीपक’ वगैरे, असे मेसेज ट्विटरवर ओसडूंन वाहू लागलेत.

(India vs Sri Lanka 2nd ODI Cricket Fans Appriciate Deepak Chahar batting Performance)

हे ही वाचा :

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा