IND vs WI : काय रे भारतीय खेळाडू, 100 धावांपर्यंत एकही विकेट काढली नाही, वेस्ट इंडिजच्या दोघांची….

भारतीय संघाला आतापर्यंत एकही विकेट काढता आली नाही. दिग्गज गोलंदाजही घाम गाळताना दिसत आहेत. पण एकालाही यश मिळत नाही. आतापर्यंत 15 धावांचा खेळ पूर्ण झाला आहे.

IND vs WI : काय रे भारतीय खेळाडू, 100 धावांपर्यंत एकही विकेट काढली नाही, वेस्ट इंडिजच्या दोघांची....
Ind vs wi
Image Credit source: social media
| Updated on: Sep 27, 2026 | 3:44 PM

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरु झाला आहे. भारताच्या वतीने कर्णधार गिलने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला पण हा निर्णय पाहिजे तसा योग्य ठरताना दिसून येत नाही. कारण तिरुवनंतपुरममध्ये भारताला आज एकही विकेट काढता आलं नाही. जवळपास 15 ओव्हरचा सामना पूर्ण झाला आहे. वेस्ट इंडिजची धावसंख्या 100 पारही गेली पण भारतीय गोलंदाजांना यश मिळालेलं नाही. पहिल्या ड्रिंक ब्रेकपर्यंत इंडिजने 107 धावा केल्या आहेत. त्यामध्ये जस्टीन ग्रीव्ह्ज हा 58 धावांवर खेळत आहे. तर कॅम्पबेल हाही लवकरच अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. तो सध्या 43 धावांवर खेळतोय. दरम्यान, भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 4, नितिश कुमारने 1 गुरुनूर ब्रार, जडेजाने 4 आणि नमन धीरने 2 ओव्हर टाकल्या आहेत.

दरम्यान, तिरुवनंतपुरममध्ये 2023 नंतर पहिल्यांदाच सामना खेळला जात आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात येथे खेळला जाणारा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 2018मध्ये हे दोन्ही संघ येथे पहिल्यांदाच आमनेसामने आले होते, तेव्हा भारताने वेस्ट इंडीजचा पराभव केला होता. थोडक्यात सांगायचे तर, तिरुवनंतपुरममध्ये आतापर्यंत केवळ दोनच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि भारताने त्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाने चार गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. नमन धीरने या सामन्यातून पदार्पण केले आणि त्याला खुद्द कर्णधार गिल यांच्या हस्ते त्याची कॅप प्रदान करण्यात आली.

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

भारत – रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, रुतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, केएल राहुल, नमन धीर, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रसीध कृष्णा

वेस्ट इंडिज – जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us