AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

सध्या भारताकडे अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. भारताने एकाचवेळी इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर संघ पाठवल्याने हे स्पष्ट होते. दरम्यान इतके खेळाडू असल्याने अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वांमध्ये कमालीची चुरस आहे.

विराट, रोहितनंतर 'हा' फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील 'कम्प्लीट पॅकेज', भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक
सूर्यकुमार यादव
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 1:03 PM
Share

कोलंबो : श्रीलंका संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने 38 धावांनी उत्कृष्ट विजय मिळवला. या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar). सूर्याने पुन्हा एकदा अप्रतिम अर्धशतक झळकावत भारताला एक चांगली धावसंख्या करुन दिली तर भुवीने चार विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. दरम्यान श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवचं आतापर्यंतचं प्रदर्शन अप्रतिम आहे. एकदिवसीय मालिकेपासून तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे त्याला थेट विराट आणि रोहितच्या पंगतीत बसवत तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लिट पॅकेज’ अशी उपमा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने दिली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 50 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 शानदार षटकारांचा समावेश होता. यावेळी सूर्याचा स्ट्राइक रेट तब्बल 147.06 होता. सूर्याने आतापर्यंत भारतासाठी चार टी-20 सामन्यात 46.33 च्या सरासरीने 139 रन्स केले आहेत.

‘प्रत्येक संघात सूर्याला स्थान मिळावं’

एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला ”मी बऱ्याच वेळापासून सूर्याला खेळताना पाहत आहे. मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना सूर्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून मी त्याला पाहतोय आता तो विराट, रोहितसारखी उत्कृष्ट फलंदाजी करु लागला आहे. तो वेगवान गोलंदासह फिरकीपटूंना अप्रतिम फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात सामिल केलं पाहिजे.”

कर्णधार धवननेही केलं कौतुक

सूर्यकुमार यादव मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज म्हणून समोर येत आहे. त्याने असेच प्रदर्शन कायम ठेवल्यास टी-20 विश्वचषकातही त्याची जागा निश्चित होईल हे नक्की! सूर्यकुमारबद्दल बोलताना कर्णधार धवन म्हणाला, ”सूर्या एक उत्तम खेळाडू आहे. आम्हाला त्याची फलंदाजी पाहताना मजा येते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्येही त्याने चांगली फलंदाजी करत माझ्यावरील दबाही कमी केला.”

इतर बातम्या

सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

(Indian Batter Suryakuma Yadav is complete package of all three formats says Harbhjan singh)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली