पृथ्वी शॉ ते इशान किशन, भारतीय क्रिकेटपटू एकापेक्षा एक सुंदर मॉडेल्सच्या प्रेमात Clean Bowled

टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा मैदानाव्यतिरिक्त प्रेमाच्या खेळपट्टीवरदेखील जलवा आहे. जरी हे खेळाडू अद्याप विवाहित नसले तरी ते 'सिंगल' नाहीत. भारतीय क्रिकेट संघात असे 6 खेळाडू आहेत, जे एकापेक्षा एक सुंदर मॉडेल्सच्या प्रेमात Clean Bowled झाले आहेत.

1/7

2/7
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला. त्यावेळी त्याने ईशा नेगीसोबतचा (Isha Negi) एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, 'मला तुला आनंदी ठेवायचे आहे कारण मी तुझ्यामुळे आनंदी आहे. ईशा आणि पंत गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशा व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे आणि ती मूळची देहरादूनची आहे. अॅमिटी विद्यापीठातून शिकलेली ईशा नेगी खूप सुंदर आहे आणि ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही.

3/7
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) फलंदाजीसह त्याच्या गर्लफ्रेंडमुळे अनेकदा चर्चेत असतो. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या (Athiya Shetty) अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांच्यापैकी दोघांनीही आतापर्यंत या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही, परंतु ते सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आपले प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, अथिया प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.

4/7
युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) रिलेशनशीपबद्दल अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पृथ्वी टीव्ही अभिनेत्री प्राची सिंगला (Prachi Singh) डेट करत आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे अनेकदा असे वाटते. तथापि, पृथ्वी आणि प्राची दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही पुष्टी केलेली नाही.

5/7
ईशान किशनची (Ishan Kishan) रूमर्ड गर्लफ्रेंड अदिती हुंडिया (Aditi Hundia) व्यवसायाने मॉडेल आहे. ती 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे आणि 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड विजेती आहे. ईशान आणि अदितीने अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

6/7
टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स कडून खेळणारा गोलंदाज राहुल चाहरने 2019 मध्ये त्याची गर्लफ्रेंड इशानीसोबत (Ishani) साखपुडा केला आहे. ही जोडी सात फेरे कधी घेणार, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

7/7
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा क्रिकेटपटू दीपक चाहरने (Deepak Chahar) त्याची मैत्रिण जयाला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या (Dubai International Stadium) स्टँडमध्ये सार्वजनिकरित्या प्रपोज केलं होतं. त्याची मैत्रीण जया भारद्वाज (Jaya Bhardwaj) हिनेदेखील दीपकच्या प्रपोजलला 'हो' असं उत्तर दिलं होतं. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI