भारतीय संघावरील कोरोनाचे संकट गडद, आणखी दोन खेळाडू कोरोनाबाधित
भारत आणि श्रीलंका संघातील सामन्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि भारताचे महत्त्वाचे खेळाडू मालिकेबाहेर झाले. आधी कृणालला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता आणखी दोन महत्त्वाच्या खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोलंबो : भारतीय संघामधील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आणि संघातील सर्वच खेळाडूंवर कोरोनाची टांगती तलवार लटकू लागली. मालिकेतील दोन टी-20 सामने शिल्लक असताना भारतातील कृणालसह 7 आणखी खेळाडूंना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या विलगीकरणातील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.
या दोन खेळाडूंची नाव युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (K. Gowtham) अशी असून दोघांनाही वेगवेगळ्या विलगीकरणात ठेवले असून मेडिकल टीम त्यांची काळजी घेत आहे. कृणालला मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या निकट संपर्कातील खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये चहल आणि गौथम दोघेही कोरोना निगेटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये दोघांच्या टेस्टही कोरोना पॉजिटिव्ह आल्या आहेत.
कृणाल पंड्यापासून कोरोनाची लागण सुरु
इतर बातम्या
IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली
सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात
(Indias legspinner Yuzvendra Chahal and Allrounder K Gowtham tested positive for Covid-19 after krunal pandya)