अष्टपैलू हार्दीक पंड्या होऊ शकतो संघाबाहेर, ‘या’ दोन गोलंदाजांमुळे संघातील स्थानाला धोका

भारताला मागील बरीच वर्ष एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू मिळत नव्हता. दरम्यान हार्दीक पंड्याच्या रुपात तो मिळाला असं वाटत असतानाच मागील काही काळात हार्दीक चांगल्या लयीत नसल्याचे दिसत आहे.

अष्टपैलू हार्दीक पंड्या होऊ शकतो संघाबाहेर, 'या' दोन गोलंदाजांमुळे संघातील स्थानाला धोका
हार्दीक पंड्या

कोलंबो : श्रीलंका संघाविरुद्ध सुरु असलेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. हार्दिक एकदिवसीय मालिकेसह एका टी-20 मालिकेत काहीच खास कामगिरी करु शकलेला नाही. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दीकने गोलंदाजी जवळपास बंदच केली होती. श्रीलंका दौऱ्यात त्याने पुन्हा गोलंदाजीला सुरुवात केली असली तरी त्याला हवं तसं यश मिळवता आलेलं नाही. दरम्यान भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपूट सुनील गावस्कर या मुद्द्यावर भाष्य करत आपलं मत दिलं आहे.

श्रीलंका संघाविरुद्ध भारताने खेळलेली एकदिवसीय मालिका संपून आता टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. दरम्यान एकदिवसीय ममालिकेत पंड्याने दोन सामन्यात फलंदाजी केली. ज्यात दुसरे वनडेमध्ये तो शून्यावर बाद झाला. तर पहिल्या सामन्यातही चांगल्या सुरुवातीनंतर तो मोठी धावसंख्या करु शकला नाही. टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात केवळ 10 रन करुन हार्दीक बाद झाला असून दुसऱ्या सामन्यात त्याची कामगिरी पाहण महत्त्वाचं असेल.

भारताकडे दोन खेळाडूंचा पर्याय

सुनील गावस्कर हार्दीकच्या फॉर्मबाबत म्हणाले की, ”हार्दिक स्वत:वर भरोसा करत नाही. तो अशाप्रकारे अयशस्वी होत राहिल्यास त्याच्यावर दबाव वाढेल.” दरम्यान गावस्करांच्या मते भारताकडे हार्दीकसाठी दोन पर्यायी खेळाडू आहेत. या दोन्ही गोलंदाजाना अष्टपैलू खेळाडू करणे गरजेचे आहे. असंही गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी स्पोर्ट्स तकशी बोलातना सांगितलं. नुकतेत दीपक चहारने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे तो एक अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो हे त्याने सिद्ध केले. तसेच भुवनेश्वर कुमारलाही संधी देणे गरजेचे आहे. 2017 मध्ये त्यानेही श्रीलंकेत अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला होता. दोघांची गोलंदाजीतर अप्रतिम आहेच त्यामुळे दोघांना अष्टपैलू खेळाडू म्हणून तयार केलं जाऊ शकतं असंही ते म्हणाले.

इतर बातम्या

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(Hardik Pandyas Place in team india in danger due to this deepak chahar and bhuvneshwar kumar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI