IND vs SL : ‘या’ नवख्या खेळाडूच्या फलंदाजीचा शिखर धवनही ‘दिवाना’, म्हणतो ‘याला फलंदाजी करताना पाहून मजा येते’

मागील काही वर्षात भारताीय संघात अनेक नव्या दमाचे खेळाडू अवतरले आहेत. यामधील एका फलंदाज क्रिकेटपटूच्या बॅटिंगचा फॅन टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन झाला आहे.

IND vs SL : 'या' नवख्या खेळाडूच्या फलंदाजीचा शिखर धवनही 'दिवाना', म्हणतो 'याला फलंदाजी करताना पाहून मजा येते'
भारतीय संघ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 26, 2021 | 6:29 PM

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला अवघ्या 126 धावांवर सर्वबाद करत सामना 38 धावांनी खिशात घातला. कोलंबोच्या के. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यातील एका खेळाडूच्या फलंदाजीवर भारताचा कर्णधार शिखर धवन चांगलाच खुश झाला आहे. त्याने त्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज म्हणत त्याची बॅटिंग पाहायला मजा येते असंही म्हटलं आहे.

हा खेळाडू म्हणजे भारताचा मिस्टर 360 फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. मुंबई इंडियन्सचा लाडका सूर्या आता भारतीय संघही गाजवत आहे.  30 वर्षीय सूर्याने पहिल्या टी-20 मध्ये 34 चेंडूत 50 धावा ठोकल्या आणि चौथ्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसरं अर्धशतक ठोकलं.

सूर्याची फलंदाजी पाहताना मजा येते

धवन सामन्यानंतरच्या प्रेजेंटेशन कार्यक्रमात म्हटला, ”सूर्यकुमार एक महान खेळाडू आहे. आम्हाला सर्वांना त्याची फलंदाजी पाहताना मजा येते. त्याने सामन्यात चांगली फलंदाजी करत माझ्यावरील दबाही कमी केला. त्याचा प्रत्येक शॉट पाहण्यासारखा असतो.”

सूर्या लवकरच इंग्लंडला रवाना होणार

सूर्यकुमार यादव आता श्रीलंका दौऱ्यानंतर लगेचच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यावेळी शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तिघे खेळा़डू दुखापतग्रस्त झाल्याने रिप्लेसमेंट म्हणून सूर्यकुमार आणि पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार आहेत.

‘प्रत्येक संघात सूर्याला स्थान मिळावं’

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनने ही सूर्यकुमारचे कौतुक केले आहेत तो म्हणाला ”मी बऱ्याच वेळापासून सूर्याला खेळताना पाहत आहे. मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना सूर्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून मी त्याला पाहतोय आता तो विराट, रोहितसारखी उत्कृष्ट फलंदाजी करु लागला आहे. तो वेगवान गोलंदासह फिरकीपटूंना अप्रतिम फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात सामिल केलं पाहिजे.”

इतर बातम्या

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(Watching suryakumar yadav batting is amazing feeling says shikhar-dhawan)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें