IPL 14 : ना विराट, ना गेल, ना डिव्हिलियर्स, आयपीएलमधील 24 कॅरेट सोने म्हणजे ‘हा’ खेळाडू

IPL Andre Russel : येत्या 9 एप्रिलपासून आयपीएल 14 चं बिगुल वाजणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु होईल.

IPL 14 : ना विराट, ना गेल, ना डिव्हिलियर्स, आयपीएलमधील 24 कॅरेट सोने म्हणजे 'हा' खेळाडू
Andre Russell
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 4:57 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल IPL-14 सुरु होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 9 एप्रिलपासून आयपीएल 14 चं बिगुल वाजणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु होईल. आयपीएल किंवा टी 20 सामने गाजवणारे खेळाडू म्हटलं की ख्रिस गेल, विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची नावं समोर येतात. मात्र टी 20 च्या इतिहासात सर्वात धोकादायक खेळाडूंच्या यादीत एक नाव आहे, ते म्हणजे आंद्रे रसेल (Andre Russell). कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळणारा आंद्रे रसेलचा  (IPL Andre Russel) जर हात बसला, तर गेल असो की डिव्हिलियर्स, रसेलसमोर सर्वजण फिके पडतात. (IPL 14 the player who change the game Kolkata Knight Riders attacking batsman andre russell)

आंद्रे रसेलमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. जागेवर उभं राहून चेंडू ग्राऊंडच्या पलिकडे पाडण्याची ताकद रसेलमध्ये आहे. वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने जगभरात टी 20 आणि टी 10 लीगमध्ये वादळ निर्माण केलं आहे.

असं असलं तरी आंद्रे रसेल आयपीएलच्या मागील हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठी कामगिरी करता आली नाही. खराब फिटनेसमुळेही रसेल मोठ्या खेळी खेळू शकला नाही. संयुक्त अरब अमिरात अर्थाय UAE मध्ये आयपीएलचा 13 वा हंगाम खेळवण्यात आला. त्यावेळी रसेल 10 सामने खेळला. मात्र केवळ 13 च्या सरासरीने त्याला केवळ 117 धावाच करता आल्या. सध्या इयॉन मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत आहे. जर नाईट रायडर्सना तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकायचा असेल तर आंद्रे रसेल तळपणं आवश्यक आहे.

चौकार कमी, षटकार जास्त

आंद्रे रसेल हा असा खेळाडू आहे, जो चौकार कमी मारतो आणि षटकार जास्त ठोकतो. रसेल हा 2017 सोडलं तर 2012 पासून सलग आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत त्याने एकूण 74 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.74 च्या सरासरीने 1517 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 अर्धशतकं झळकावली आहेतच, शिवाय 10 वेळा तो नाबाद राहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे 74 सामन्यात रसेलने 105 चौकार ठोकले आहेत, तर तब्बल 129 षटकार खेचले आहेत.

2019 मध्ये धमाका

आयपीएलच्या 2019 चा हंगाम रसेलसाठी दमदार होता. 2019 मध्ये 14 सामन्यांत त्याने 510 धावा ठोकल्या. 4 सामन्यात तो नाबाद राहिला. त्यावेळी त्याची सरासरी 56.66 इतकी होती. नाबाद 80 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्या सीजनमध्ये 31 चौकार आणि 52 षटकार ठोकले होते.

संबंधित बातम्या  

‘तुझा आवडता क्रिकेटर कोण?’, रिषभची मैत्रीण इशा नेगीचं ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ उत्तर, चाहते म्हणाले….

IPL 2021 : ‘बापसे बेटी सवाई!’, बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video

IPL मध्ये हॅट्रिक कुणी कुणी घेतली? अमित मिश्रा आणि युवराजची जादू, रोहितचा खास अंदाज!, वाचा पूर्ण लिस्ट…

(IPL 14 the player who change the game Kolkata Knight Riders attacking batsman andre russell)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.