AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दिवसात IPL शी संबंधित 10 जणांना कोरोनाची बाधा, 2 संघ आणि एका मैदानाला कोरोनाचा विळखा, BCCI च्या चिंता वाढल्या

कोरोनाने (Corona Virus) आता केकेआरनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (Chennai Super Kings) ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे.

एकाच दिवसात IPL शी संबंधित 10 जणांना कोरोनाची बाधा, 2 संघ आणि एका मैदानाला कोरोनाचा विळखा, BCCI च्या चिंता वाढल्या
Sourav Ganguly With Jay Shah
| Updated on: May 03, 2021 | 5:11 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, आयपीएलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. (IPL 2021 : corona virus cases CSK players tested positive after KKR)

कोरोनाने आता केकेआरनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (Chennai Super Kings) ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत.

याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही शहरात कोरोनाचा आलेख चढता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे.

सध्या चेन्नई सुपरकिंग्जची टीम दिल्लीत आहे. असे म्हटले जात आहे की, विश्वनाथन, बालाजी आणि बस क्लीनरची 3 मे रोजी (आज) पुन्हा चाचणी घेण्यात आली आहे. जेणेकरुन फॉल्स पॉझिटीव्ह रिपोर्ट्सबाबतच्या शक्यता दूर होतील. या तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बायो बबलमधून बाहेर काढून 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे. तसेच लागोपाठ दोन वेळा कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच ते पुन्हा एकदा बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतील आणि आपल्या संघासोबत राहतील.

कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (varun chakravarthy) आणि संदीप वॉरियर (sandeep warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

पॅट कमिन्स आजारी?

आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

संबंधित बातम्या

IPL मध्ये वात पेटली, KKR नंतर आता धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह

KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

(IPL 2021 : corona virus cases CSK players tested positive after KKR)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.