AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : ‘भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल…’ मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांना रोखायचं कसं?, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन!

मुंबई इंडियन्सचे सगळे खेळा़डू एकाचढ एक फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजांना रोखायचं कसं, असा प्रश्न प्रतिस्पर्धी संघांना पडलाय. | IPL 2021 Mumbai Indians MI In form Batsman

IPL 2021 : 'भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल...' मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांना रोखायचं कसं?, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन!
मुंबई इंडियन्स
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 05, 2021 | 9:36 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील रणसंग्रामाला केवळ 4 दिवस उरलेत. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलचा 14 वा मोसम सुरु होत आहे. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सगळे खेळा़डू एकाचढ एक फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजांना रोखायचं कसं, असा प्रश्न प्रतिस्पर्धी संघांना पडलाय. बहुतेक संघांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंविषयी चर्चा होत आहे. एकूणच मुंबईच्या खेळाडूंविषयीची एक प्रकारची धास्ती प्रतिस्पर्धी संघांनी घेतलीय. (IPL 2021 Mumbai Indians In form Batsman Rohit Sharma ishan Kishan hardik pandya Suryakumar yadav Kieron pollard quinton de kock krunal Pandya)

रोहित शर्मा (Rohit Shama)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट जगतातला आक्रमक ओपनर बॅट्समन आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी बोलर्सवर तुटून पडायचं आणि पॉवरप्लेमध्ये खोऱ्याने धावा ओढायच्या, हे त्याचं वैशिष्ट्य… वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक त्याच्या नावावर आहेत तर मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात सर्वोत्तम ओपनर बॅट्समन म्हणून तो ओळखला जातो. त्याला सुरुवातीलाच आऊट करणं, हे प्रतिस्पर्धी संघांसाठी कधीही चांगलं. एकदा का त्याने खेळपट्टीवर ठाण मांडलं तर त्याने मोठी इनिंग खेळलीच म्हणून समजा.

इशान किशन (Ishan Kishan)

ईशान किशन भारताचा युवा फलंदाज.. त्याच्या बॅटिंगने त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. आयपीएल 2020 मध्ये त्याने मुंबईकडून सर्वांत जास्त रन्स केले. तसंच आयपीएलच्या 51 मॅचमध्ये त्याने 1211 रन्स केले. 2020 साली मुंबईला चॅम्पियन बनवण्यात इशान किशनचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

क्विंटन डी कॉक (Quinton de kock)

दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकची बॅट सदा बोलत असते. त्याने आतापर्यंत 66 आयपीएल मॅचमध्ये 1959 रन्स केले आहेत. सध्याही तो तुफान फॉर्ममध्ये आहे. मुंबईकडून ओपनिंगला येऊन त्याने अनेकदा आक्रमक सुरुवात करुन मुंबईच्या विजयाचा पाया रचलाय.

सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

भारताचा नवोदित तळपता सूर्य… ज्याच्या भात्यात एकापेक्षा एक आक्रमक फटक्यांचा समावेश आहे. लेग साईटला आणि ऑफ साईटलाही तो तितक्याच ताकदीने शॉट्स मारतो. ज्याच्या बॅटला सीमारेष 30 यार्डासारखी वाटते. मागील काही वर्षांत सुर्यकुमारने अनेक यादगार खेळी खेळल्या आहेत. मागील काही मोसमात आयपीएलमध्ये त्याने मुंबईकडून आश्वासक बॅटिंग केलीय. इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने केलेली फटकेबाजी कोण कसा विसरेल? सध्या तो तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखायचं कसं, असा प्रश्न सध्या बोलर्सला पडलेला आहे.

कायरन पोलार्ड (Kieron Pollard)

मुंबईकडून खेळत असलेला कायरन पोलार्ड सर्वांत विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सामना पलटवण्याची त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. मुंबई इंडियन्सला काही सामने पोलार्डने एकहाती जिंकवून दिले आहेत. अशक्यप्राय वाटणारे अनेक सामने पोलार्डच्या बॅटमुळे मुंबई जिंकलीय.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

जागतिक क्रिकेटमधला सर्वांत मोठा बिग हिटर म्हणून हार्दिक पांड्याचं नाव घेतलं जातं. मुंबईसाठी हार्दिकने अनेक मोठ्या इनिंग खेळल्या आहेत. कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्यात तो पटाईत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने धडाकेबाज कामगिरी केलीय. त्याला लवकरात लवकर वेसण घालणं, प्रतिस्पर्ध्यांसाठी आवश्यक आहे.

क्रुणाल पांड्या (Hardik Pandya)

क्रुणाल पांड्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. त्याच्याकडे अनेक क्लासिक फटके आहेत. त्याने हे वेळोवेळी दाखवून दिलंय. आयपीएलच्या पाठीमागच्या तीन ते चार हंगामात त्याने मुंबईकडून संधी मिळेल तेव्हा बहारदार कामगिरी केलीय. यंदाही तशीच कामगिरी करण्यास तो सज्ज आहे.

(IPL 2021 Mumbai Indians In form Batsman Rohit Sharma ishan Kishan hardik pandya Suryakumar yadav Kieron pollard quinton de kock krunal Pandya)

हे ही वाचा :

IPL 2021 : हे 5 खेळाडू RCB चं नशीब पलटवू शकतात, संपवू शकतात जेतेपदाचा दुष्काळ!

IPL इतिहासातली युवा कर्णधारांची संपूर्ण लिस्ट, रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी!

Photos | हार्दिक आणि नताशासोबत मुलगा अगस्त्यची स्विमिंग पूलमध्ये धमाल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली