AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) महिनाभरापूर्वी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
धनश्री वर्मा (इन्स्टाग्राम स्नॅप)
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 22, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई :   आयपीएलची (IPL 2021) धूम तूर्तास थांबली आहे. कोरोनामुळे  किक्रेटच्या लढाईला ब्रेक लागला असून, आता फक्त कोरोनाविरुद्धच युद्ध सुरु आहे.  दुसरीकडे खेळाडू आणि त्यांची पत्नी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात दंग आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) महिनाभरापूर्वी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.  या व्हिडीओत ती भांगडा डान्स करताना दिसून येत आहे. धनश्रीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर जाळ आणि धूर संगटच काढला आहे.  (IPL 2021 RCB Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video Goes Viral On Social Media)

धनश्रीचा धमाकेदार डान्स

धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक शानदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती भांगडा नृत्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या सौदा खरा खरा या गाण्यावर धनश्री वर्मा डान्स करत आहे. लाल टी शर्ट आणि काळ्या रंगाची पँन्ट तिने परिधान केलीय. या कलर कॉम्बिनेशनमध्ये ती कमालीची सुंदर आहे. तसंच या डान्समध्ये तिने सुंदर एक्सप्रेशन दिले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडलाय.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

श्रेयस अय्यर आणि धनश्रीचे ठुमके

धनश्रीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबत ठेका धरला होता. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ‘More skills on the board ? You’ve aced it just like hitting a perfect six @shreyas41 ‘ असं कॅप्शन देत धनश्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. धनश्रीसोबत श्रेयसनंही एकदम परफेक्ट स्टेप्स केल्यानं चाहते थक्क झाले होते.

(IPL 2021 RCB yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video Goes Viral On Social Media)

हे ही वाचा :

IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!

IPL 2021 : नाद करा पण माझा कुठं?, रैना-कोहलीला पछाडत रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड!

IPL 2021 : इशान किशनला झालंय तरी काय?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...