AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians IPL 2023 | मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये आता कोणत्या टीम विरुद्ध भिडणार?

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या विजयाच्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता मुंबई आपला पुढील सामना कधी आणि कुठे खेळणार जाणून घ्या.

Mumbai Indians IPL 2023 | मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये आता कोणत्या टीम विरुद्ध भिडणार?
Image Credit source: mumbai indians twitter
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 22, 2023 | 1:29 AM
Share

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 70 व्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. आरसीबीसाठी हा सामना प्लेऑफमध्ये पोहचण्यसाठी मस्ट विन असा होता. कारण मुंबई इंडियन्स टीमने डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघावर विजय मिळवला होता. मात्र गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याने ठोकलेल्या नाबाद आणि निर्णायक शतकामुळे आरसीबीचा पराभव झाला. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 198 धावांचं आव्हान गुजरातने 5 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं.

आरसीबीचं या पराभवसह आयपीएल 16 व्या मोसमातील प्रवास इथेच संपला. आरसीबीच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. आता मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये आपला पुढील सामना कुणा विरुद्ध खेळणार हे आपण जाणून घेऊयात. मात्र त्याआधी प्लेऑफमध्ये कोणत्या 4 टीम पोहचल्या आहेत ते पाहुयात.

प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्से सर्वात आधी प्रवेश केला. त्यानंतर 20 मे रोजी आधी चेन्नई सुपर किंग्स आणि त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने धडक मारली. तर आता मुंबई इंडियन्स पोहचली आहे.

मुंबईचा सामना कधी आणि कुणासोबत?

मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि लखनऊ तिसरी टीम ठरली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 24 मे रोजी एलिमिनेटर खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

या एलिमिनेटरमध्ये जिंकणारी टीम क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या टीम विरुद्ध खेळेल. प्लेऑफ 2 मध्ये एलिमिनेटर जिंकणारी आणि क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आमनेसामने असतील. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुप किंग्स यांच्यात सामना होईल. हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत टीम एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये भिडेल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?