AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Orange and Purple Cap | आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांच्या घरच्या म्हणजेच एण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पराभूत केलं. या सामन्यानंतर ऑरेन्ज कॅप आणि पर्पल कॅपचं गणित कसं बदललं पाहा.

IPL 2023 Orange and Purple Cap | आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
| Updated on: Apr 18, 2023 | 1:52 AM
Share

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसम जसाजसा पुढे सरकतोय तसातसा थरार आणि रंगत वाढत जातेय. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक आणि थरारक सामने पाहायला मिळतेय. एकूण 10 संघांमध्ये सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातोय. तसाच वैयक्तिक पातळीवर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेन्ज आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी आणि ती कायम राहण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. एका सामन्याने, एका धावेने आणि एका विकेटने ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचं गणित ठरतयं. आज एकाकडे असलेली कॅप दुसऱ्या दिवशी कोणाकडे असेल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. यावरुन ही कॅप आपल्याकडे ठेवण्यासाठी किती चढाओढ आहे, याचा अंदाज बांधता येतो.

ऑरेन्ज आणि पर्पल कॅप नक्की काय?

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सामन्यानुसार ज्या फलंदाजाचे सर्वाधिक धावा त्याला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. तर सर्वाधिक विकेट्स असलेल्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्याच्या नावावर जास्त विकेट्स असतात, तो गोलंदाज आणि फलंदाज ती कॅप आपल्या नावावर करतो. मात्र मोसमादरम्यान कामगिरीनुसार कॅपची अदलाबदल होत असते.

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 24 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. चेन्नईने हा हायस्कोरिंग सामना 8 धावांनी जिंकला. चेन्नईे दिलेल्या 227 धावांचं आव्हान पार करताना आरसीबीला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 218 धावाच करता आल्या. आरसीबीकडून ग्लेम मॅक्सवेल याच्या 76 धावांच्या खेळीनंतर फाफ डु प्लेसी यानेच दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 62 धावा केल्या. फाफने या खेळीदरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स टीमचा फलंदाज वेंकटेश अय्यर याच्याकडे असलेली ऑरेन्ज कॅप पटकावली. वेंकटेशने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.

फाफ डु प्लेसिस ऑरेन्ज कॅप होल्डर

फाफने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 20 चौकार आणि 18 सिक्स ठोकत 172.66 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. फाफची नाबाद 79* ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

पर्पल कॅप कुणाकडे?

पर्पल कॅप ही आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यानंतरही राजस्थान रॉयल्स टीमचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्याकडे कायम आहे. युजवेंद्र चहल याने 5 सामन्यात 20 ओव्हर टाकून 7.85 च्या इकॉनॉमी रेटने 157 धावा देत 20 विकेट्स घेतल्या आहेत. चहलची 17 धावा देत 4 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार विशाक आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीक्षना.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार