खराब कामगिरीमुळे रोहित शर्माला पुन्हा बनवणार कर्णधार? हार्दिकचे आश्चर्यचकीत निर्णय

Mumbai indians : पहिल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फ्लॉप राहिली आहे. दोन्हीही सामने मुंबईने गमावले आहेत. हार्दिक पांड्याच्या चुकीच्या निर्णयामुळे हे सामने गमवल्याचं चाहत्यांनी म्हटले आहे. यामुळे त्याच्यावर बरीच टीका देखील होत आहे.

खराब कामगिरीमुळे रोहित शर्माला पुन्हा बनवणार कर्णधार? हार्दिकचे आश्चर्यचकीत निर्णय
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 5:30 PM

Mumbai Indians Captain : आयपीएल 2024 ची धमाकेदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्याच सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. जास्तीत जास्त सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाकडून होत आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. संघाचे बॉलर आणि बॅट्समन चांगली कामगिरी करु शकलेले नाही.

पहिल्या सामन्यात ६ धावांनी पराभूत

मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 धावांनी पराभूत केले होते. कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात जसप्रीत बुमराहला पहिली बॉलिंग देण्याऐवजी स्वत: पहिली बॉलिंग टाकली होती. बुमराहला दुसरी ओव्हरही देण्यात आली नव्हती. जेव्हा गुजरातच्या फलंदाजांनी स्फोटक पद्धतीने 3 ओव्हरमध्ये 27 धावा केल्या. यानंतर त्याने चौथ्या ओव्हरसाठी बुमराहला आणले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना तो फलंदाजीला यायला हवा होता. 5 विकेट पडल्यानंतर तो फलंदाजीला आला. त्यामुळे त्याच्या या निर्णयांवर अनेक टीका झाली.

दुसऱ्या सामन्यात पण फ्लॉप

मुंबई इंडियन्स संघाला सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्या सामन्यात 31 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज फ्लॉप ठरले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने तब्बल 277 धावा कुटल्या. जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. हार्दिकने चार ओव्हरमध्ये ४६ धावा दिल्या आणि त्याला फक्त एकच विकेट मिळाली. हार्दिकही या सामन्यात बॅटनेही फ्लॉप ठरला. त्याला फक्त २४ धावा करता आल्या.

चाहते संतापले

आता दोन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्यावर टीका होऊ लागली आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पण रोहितला कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्यात यावे अशी मागणी चाहते करु लागले आहेत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.