IPL 2024, PBKS vs DC : स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमनेसामने, हे खेळाडू सांभाळतील मोर्चा

| Updated on: Mar 22, 2024 | 3:47 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची जेतेपदाची झोळी अजूनही रिकामीच आहे. त्यामुळे विजयाची सुरुवात कोणता संघ करतो याकडे लक्ष लागून आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स 32 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही संघांनी 16 सामन्यात विजय आणि 16 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

IPL 2024, PBKS vs DC : स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमनेसामने, हे खेळाडू सांभाळतील मोर्चा
IPL 2024, PBKS vs DC : पंजाब दिल्लीच्या या खेळाडूंकडे असले विजयाची चावी, संभाव्य प्लेइंग 11 आणि इतर बाजी जाणून घ्या
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ भिडणार आहे. स्पर्धेत विजयाचा नारळ कोण फोडतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दोन्ही संघांना आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी साखळी फेरीत चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. 23 मार्च रोजी मोहालीच्या महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती, तर दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती असणार आहे. अपघातात झालेल्या दुखापतीतून 14 महिन्यांनी बरा होऊन ऋषभ पंत मैदानात परतत आहे. त्याच्याकडून दिल्ली कॅपिटल्सला खूप अपेक्षा आहेत. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सची स्थिती एकदम बिकट राहिली आहे. दुसरीकडे, कॅप्टन्स ग्रुप फोटोत शिखर धवन नसल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आलंआहे. पण शिखर धवनची तब्येत ठिक नसल्याने त्याच्या जागी उपकर्णधार जितेश शर्मा आल्याचं सांगितलं गेलं. असं एकंदरीत सर्व पार्श्वभूमी असताना दोन्ही संघांच्या मिळून 11 खेळाडूंकडे सामन्याची चावी असणार आहे. चला त्याबाबत जाणून घेऊयात

या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर

रणजी ट्रॉफीत तसं पाहिलं तर पृथ्वी शॉची बॅट हवी तशी चालली नाही. दुसरीकडे, 14 महिन्यानंतर परतलेल्या ऋषभ पंतकडून किती अपेक्षा ठेवणार हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे विकेटकीपर बॅटर म्हणून जितेश शर्मा आणि अभिषेक पोरेल उजवे ठरतील. तर फलंदाजीत पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्याकडून अपेक्षा आहेत. अष्टपैलू म्हणून मिचेल मार्श, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन आणि अक्षर पटेल यांच्या हाती धुरा असेल. तर गोलंदाजीत कुलदीप यादव आणि कगिसो रबाडा हे मोर्चा सांभाळू शकतात. दोन्ही संघांच्या मिळून या 11 खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, ऱ्हाय रिचर्डसन