IPL 2024 : आयपीएलच्या ‘त्या’ नियमामुळे पॉवर प्लेचं गणित बदलणार, फलंदाजांना फुटणार घाम

आयपीएलच्या मागच्या पर्वात इम्पॅक्ट नियमामुळे बरीच उलथापालथ झाली होती. आता अशाच एका नव्या नियमामुळे आयपीएलवर प्रभाव पडणार आहे. इतकंच काय तर पॉवर प्लेचं गणितच बदलून जाणार आहे. खोऱ्याने धावा करताना फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कसा आणि का तो समजून घ्या सोप्या शब्दात.

IPL 2024 : आयपीएलच्या 'त्या' नियमामुळे पॉवर प्लेचं गणित बदलणार, फलंदाजांना फुटणार घाम
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 11:53 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानात हा सामना रंगणार आहे. 17 व्या पर्वाआधी घेतलेल्या एका निर्णयामुळे वेगवान गोलंदाजांचा भाव वधारलेला आपण पाहिला. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससाठी फ्रेंचायसींनी कोट्यवधी रुपये मोजले. त्याला कारणही तसंच आहे. नव्या नियमामुळे वेगवान गोलंदाजांना जास्तीचं बळ मिळणार आहे. त्यामुळे त्याचा थेट इम्पॅक्ट हा पॉवर प्लेवर होणार आहे. डेथ ओव्हरमध्येही फटकेबाजी करताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पॉवर इम्पॅक्ट टाकणारा बदल म्हणजे एका षटकात वेगवान गोलदाजांना दोन बाउन्सर टाकता येणार आहेत. हा नियम या हंगामापासून लागू होणार आहे. देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली चषकादरम्यान या नियमाची चाचपणी घेण्यात आली होती.

पॉवर प्लेच्या पहिल्याच सहा षटकात एकूण 36 चेंडू टाकले जातील. त्यापैकी 12 चेंडू हे बाउंसर असतील. त्यामुळे फलंदाजांना 24 चेंडूच व्यवस्थितरित्या मिळतील. पण वेगवान गोलंदाज बाउंसर चेंडू आपल्या भात्यातून कधी काढतील ते सांगता येत नाही. सुरुवातीलाच दोन चेंडू टाकले तर फलंदाजाची धास्ती निघून जाईल. त्यामुळे गोलंदाजही तिसऱ्या चौथ्या चेंडूवरच फलंदाजांना बिट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे फलंदाजही बाउंसरच्या चक्रात अडकून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटकेबाजी करण्यास कुठेतरी अडथळा येईल.

नियम 41.6 हा शॉर्ट पिच बाउंसर चेंडूशी निगडीत आहे. 41.6.1.4 अंतर्गत आता एक गोलंदाज प्रत्येक षटकात दोन बाउंसर टाकू शकतो. या चेंडूवर तशी फटकेबाजी करणं फलंदाजांना अडचणीचं जाणार आहे. पण एखादा चेंडू डोक्यावरून गेला तर तो वाइडच गणला जाईल. 41.6.1.7.1 अंतर्गत शॉर्ट पिच बॉलसंदर्भातील संशय दूर करण्यासाठी वाईड चेंडू गणला जाईल. पण हा चेंडूही बाउंसर म्हणूनच गणला जाईल.

दुसरीकडे, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये एखादा फलंदाज निवृत्त झाला तर तो त्याच डावात किंवा त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये फिल्डिंग कर्णधाराच्या संमतीनंतरही फलंदाजी करू शकणार नाही. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात ही बाब अधोरेखित झाली होती.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....