LSG vs DC : समीर रिझवीची Imapct खेळी, दिल्लीची विजयी सलामी, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
Lucknow Super Giants vs Delhi Capitals Match Result : दिल्ली कॅपिट्ल्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात घराबाहेर सामना जिंकणारी पहिली टीम ठरली आहे.दिल्लीने लखनौला पराभवाची धुळ चारली आहे.

समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने लखनौवर 6 विकेट्सने एकाना स्टेडियममध्ये विजय मिळवला आहे. लखनौने दिल्लीसमोर विजयासाठी 142 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 17 बॉलआधी 6 विकेट्सआधी पूर्ण केलं. दिल्लीने 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 145 धावा केल्या. दिल्लीचा हा लखनौ विरूद्धचा स्पर्धेच्या इतिहासातील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला. समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स ही जोडी दिल्लीच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर लखनौ यंदाही दिल्लीला विजयापासून रोखण्यात अपयशी ठरली.
सामन्याचा धावता आढावा
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधार अक्षर पटेल याचा निर्णय योग्य ठरवला. लखनौला दिल्लीच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीने लखनौला 18.4 ओव्हरमध्ये 141 रन्सवर ऑलआऊट केलं. लखनौसाठी ओपनर मिचेल मार्श याने 35 धावा केल्या. तर अब्दुल समद याने 36 धावांचं योगदान दिलं. तर त्या व्यतिरिक्त एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. दिल्लीसाठी लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कॅप्टन अक्षर पटेल याने 1 विकेट मिळवत लखनौला गुंडाळण्यात योगदान दिलं.
लखनौची कडक सुरुवात
लखनौने विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीला झटपट 4 झटके दिले. त्यामुळे दिल्लीची वाईट सुरुवात झाली. दिल्लीच्या चौघांपैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. केएल राहुल आणि कॅप्टन अक्षर पटेल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. पाथुम निसांका याने 1 तर नितीश राणा याने 15 धावांचं योगदान दिलं. दिल्लीची त्यामुळे 4.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 26 अशी स्थिती झाली.
पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी आणि विजयी भागादारी
त्यानंतर समीर आणि ट्रिस्टन या जोडीने कमाल केली आणि सामनाचा दिल्लीच्या नावावर केला. समीर आणि ट्रिस्टन या दोघांनी संयमी सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी संधी मिळेल तशी फटकेबाजी केली आणि दिल्लीला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. समीर रिझवी याने 47 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह नाबाद 70 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने 39 धावांचं योगदान दिलं. समीर आणि ट्रिस्टन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 76 बॉलमध्ये 119 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. दिल्लीने अशाप्रकारे सामना जिंकला.