IPL 2026 : आरसीबी प्लेऑफमध्ये, 3 जागांसाठी 7 संघांत चुरस, केकेआर-पंजाबला किती संधी?

IPL 2026 Playoffs Scenario : आयपीएलचा 19 व्या मोसम रंगतदार स्थितीत पोहचला आहे. प्लेऑफसाठी दिवसेंदिवस रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर उर्वरित 3 जागांसाठी 7 संघांमध्ये चुरस आहे.

IPL 2026 : आरसीबी प्लेऑफमध्ये, 3 जागांसाठी 7 संघांत चुरस, केकेआर-पंजाबला किती संधी?
IPL 2026 Playoffs Scenario
Image Credit source: Bcci
| Updated on: May 18, 2026 | 10:41 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) प्लेऑफचं वेळापत्रक काही आठवड्यांआधी जाहीर करण्यात आलं. तेव्हापासून क्रिकेट चाहत्यांना प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या अंतिम 4 संघांची प्रतिक्षा आहे. दरवर्षी प्लेऑफसाठी चुरस असते. टॉप 2 मध्ये आपलं आव्हान राखणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 1 संधी जास्त मिळते. त्यामुळे टॉप 2 साठी चढाओढ असते. मात्र यंदा चित्र उलट आहे. या 19 व्या हंगामात तब्बल 61 सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्लेऑफसाठी पहिला संघ अधिकृतरित्या पात्र ठरला. रविवारी 17 मे रोजी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. आरसीबीने पंजाबला पराभूत करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यामुळे आता उर्वरित 3 जागांसाठी चुरस आहे. या निमित्ताने कोणत्या संघाला प्लेऑफची किती संधी आहे? हे जाणून घेणार आहोत. रविवारी 17 मे पर्यंत 19 व्या मोसमातील 62 सामने खेळवण्यात आले. आता साखळी फेरीतील आणखी 8 सामने बाकी आहेत. मात्र त्यानंतरही प्लेऑफचा पेच कायम आहे. प्लेऑफसाठी 1 संघ निश्चित झाला आहे....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us