IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकट

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गतविजेत्या आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं झालं आहे. आता उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकताच प्लेऑफमध्ये पोहोचल्याची अधिकृत घोषणा होईल. पण आरसीबीने केकेआरला पराभूत करताच सहा संघांना अडचणीत आणलं आहे.

IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकट
IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकट
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 14, 2026 | 4:39 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 57व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने केकेआरवर 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर आरसीबीच्या खात्यात 16 गुण पडले असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या गुणतालिकेतील या स्थितीमुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेले सहा संघ अडचणीत आले आहेत. आरसीबी आणि गुजरात टायटन्स प्रत्येकी 16 गुणांसह पहिल्या दोन स्थानांवर आहेत. आरसीबी आणि गुजरातने पुढील दोन सामने जिंकले, तर ते निश्चितपणे पहिला क्वालिफायर खेळतील.तर मुंबई इंडिनयन्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादपासून आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघ अडचणीत आला आहे. एकूण सहा संघांसाठी आता प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे.

या सहा संघांमध्ये चुरशीची लढाई

आयपीएल स्पर्धेतील गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे 14 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्सचे 13 गुण आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 12 गुण आणि सहाव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचे 12 गुण आहेत. त्यामुळे या चार संघांना टॉप चार मध्ये जागा मिळवणं वाटते तितकं सोपं नाही. या संघांना केवळ उर्वरित सामने जिंकायचे नाहीत, तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. कारण चारही संघांचे गुण जवळपास एक दोन विजयाच्या फरकाने आहेत. त्यामुळे नुसता विजय नाही तर नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. इतकंच काय तर 16 गुण मिळवलेल्या आरसीबी आणि गुजरातच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्ससाठी प्लेऑफ अधिकच कठीण झाले आहे. आतापर्यंत केवळ 10 गुण असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने जरी आपले पुढील दोन सामने जिंकले तरी 14 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफची शर्यत फक्त औपचारिकता आहे. पण इतर संघाच्या जय पराजयानंतर नेट रनरेटच्या आधारावर गणित सुटू शकतं. तशीच स्थिती केकेआरची आहे. 11 सामने खेळून फक्त 4 सामने जिंकले असून 9 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. केकेआर संघाचा नेट रन रेट सध्या -0.198 आहे. त्यामुळे, केकेआरने पुढील सामने जिंकले तरी, प्लेऑफमध्ये पोहोचायचा मार्ग कठीण आहे. त्यांना सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या पुढील सामन्यांतील पराभवाची वाट पाहावी लागेल.

Follow Us