Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा धमाका, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Vaibhav Sooryavanshi World Record : वैभव सूर्यवंशी याने आयपीएल आणि विविध वयोगटातील स्पर्धेत खेळताना अनेक रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स उद्धवस्त केले आहेत. त्यानंतर आता भारतीय संघात निवड होताच वैभवने सचिन तेंडुलकर यांचा 37 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढण्यात यश मिळवलंय.

वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. वैभव सूर्यवंशी याने 2025 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं.वैभवने त्यानंतर अंडर 19 आणि इंडिया ए टीमचं प्रतिनिधित्व करत आपली छाप सोडली. वैभवने टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. तसेच त्यानंतर वैभवने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप पटकावली. त्यानंतर वैभवला सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. वैभवची वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सिनिअर टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. वैभवने त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होताच मोठा कारनामा केला आहे. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड होणार सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. वैभवने यासह टीम इंडियाचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
सचिनचा महारेकॉर्ड मोडीत
A maiden #TeamIndia call-up at the age of 1️⃣5️⃣ 🌟
Congratulations to Vaibhav Sooryavanshi on setting a remarkable record 👏 pic.twitter.com/htOt9kci4p
— BCCI (@BCCI) June 6, 2026
सचिनची वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा भारतीय संघात निवड करण्यात आली होती. सचिनला 1989 साली पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदा भारतीय संघात संधी देण्यात आली होती. तर वैभवला सचिनच्या तुलनेत 1 वर्षाआधी भारतीय संघात स्थान मिळालं आहे. वैभवने यासह सचिनचा 37 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला आहे.
तसेच सचिनने वयाच्या 16 वर्ष 205 व्या दिवशी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. सचिनने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. तर वैभव सूर्यवंशी याची वयाच्या 15 वर्ष 71 व्या दिवशी पहिल्यांदा भारतीय संघात संधी मिळाली आहे.
टीम इंडियाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा
टीम इंडिया जून महिन्याच्या अखेरीस आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 मॅचची टी 20I सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी वैभवची निवड करण्यात आली आहे. वैभवला या दोन्ही मालिकांमधील एकूण 7 पैकी एकाही सामन्यात संधी मिळाली तर त्याच्या नावावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल. वैभवला 7 पैकी एकाही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तो सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याबाबत सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढेल.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यात बेलफास्टमध्ये 26 आणि 28 जून रोजी 2 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच 1 ते 11 जुलै दरम्यान उभयसंघात 5 टी 20I सामन्यांच्या मालिकांचा थरार रंगणार आहे.