AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : बंद दाराआड बुमराह भाऊची तयारी, तुम्ही व्हिडीओ बघितला का?

आयपीएलचा पहिला आणि सलामी सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु या दोन मातब्बर संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह तयारीला लागला आहे (Jasprit Bumrah share workout video on Instagram).

VIDEO : बंद दाराआड बुमराह भाऊची तयारी, तुम्ही व्हिडीओ बघितला का?
जसप्रीत बुमराह काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच तो आयपीएल खेळणार आहे
| Updated on: Mar 30, 2021 | 7:27 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या निमित्तानेच तो इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये खेळला नाही. मात्र, आता लवकरच आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. येत्या 9 एप्रिल पासून आयपीएलच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे आयपीएलचा पहिला आणि सलामी सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु या दोन मातब्बर संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह तयारीला लागला आहे. बुमराहने याबाबतचा एक व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे (Jasprit Bumrah share workout video on Instagram).

गेल्या मोसमात बुमराह ठरला हुकमी एक्का

जसप्रीम बुमराहने त्याच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघातील महत्त्वपूर्ण खेळाडूंमधील एक आहे. आयपीएलचा तिराव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारली होती. मुंबई इंडियन्सच्या या विजयामागे बुमराहचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. बुमराहने 15 सामन्यांमध्ये 27 विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे एका सामन्यात त्याने 4 विकेट घेऊन फक्त 14 रन दिले होते. बुमराहच्या आयपीएलमधील एकंदरीत कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 109 विकेट्स घेतल्या आहेत.

व्हिडीओ बघा :

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

मुंबई इंडियन्सचे चार खेळाडू क्वारंटाईन

टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव सोमवारी (29 मार्च) मुंबईत दाखल झाले. हे चारही खेळाडू पुण्यात खेळवण्यात आलेल्या वनडे सीरिजमध्ये सहभागी होते. ही सीरिज संपल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत एका हॉटेलमध्ये संघातील इतर खेळाडू आधीपासूनच दाखल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ हे चारही खेळाडू टीमसोबत जुळले आहेत. सर्व खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत. मात्र, क्वारंटाईन काळातही ते मेहनत करत आहेत (Jasprit Bumrah share workout video on Instagram).

हेही वाचा : IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.