नशीब असावं तर जो रूटसारखं! क्लीन बोल्ड झाला, तरीही राहिला नॉट आऊट; पाकिस्तानच्या आनंदावर विरजण

इंग्लंडने पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात सामन्यात पाकिस्तानने त्यातल्या त्यात लढा देण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या डावात जो रूटची विकेट एक चुकीमुळे गेली. नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊया..

नशीब असावं तर जो रूटसारखं! क्लीन बोल्ड झाला, तरीही राहिला नॉट आऊट; पाकिस्तानच्या आनंदावर विरजण
नशीब असावं तर जो रूटसारखं! क्लीन बोल्ड झाला, तरीही राहिला नॉट आऊट; पाकिस्तानच्या आनंदावर विरजण!
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 12, 2026 | 6:24 PM

Joe Root, ENG vs PAK 3rd Test: बर्मिंघमच्य एजबेस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 8 गडी राखून पराभूत केलं. खरं तर पाकिस्तानने इंग्लंडसमोर 130 धावांचं छोटं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंड सहज गाठेल असं वाटलं होतं. पण दोन विकेट झटपट गेल्यानंतर थोडी अतितटीची लढत होईल असं वाटलं. इंग्लंडने 35 धावांवर आपले 2 गडी गमावले होते आणि सामना रंजक वळणावर जाईल असं वाटत होतं. त्यात जो रूटची विकेटही मिळाली होती. पण एक चूक महागात पडली आणि जो रूटला फलंदाजीची पुन्हा संधी मिळाली. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट क्लीन बोल्ड झाला होता. जो रूट 23 धावांवर खेळत असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अलीचा एक उत्कृष्ट इन-स्विंग चेंडू रूटच्या बॅटचा कडा घेऊन थेट स्टंप्सवर जाऊन आदळला आणि क्लिन बोल्ड झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी जल्लोष सुरू केला आणि रूट निराश होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने निघू लागला. पण तेव्हा एक ट्वीस्ट आला.

मैदानातील पंचांनी गोलंदाजाचा पाय रेषेच्या बाहेर गेल्याचे पाहिले होतं आणि जल्लोष सुरू असताना ‘नो-बॉल’चा इशारा दिला होता. इतकंच काय तर थर्ड अंपायरने तपासणी केली असता मोहम्मद अलीचा पाय रेषेच्या खूप पुढे होता, असं दिसून आलं. त्यामुळे जो रूटला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. जो रूट जेव्हा बोल्ड झाला, तेव्हा इंग्लंडला विजयासाठी आणखी 95 धावांची गरज होती. जर तिथे पाकिस्तानला रूटची विकेट मिळाली असती, तर सामन्याचे चित्र बदलू शकले असते. मात्र, मिळालेल्या या सुवर्णसंधीचा जो रूटने पुरेपूर फायदा उठवला. जीवनदान मिळाल्यानंतर त्याने अधिक आक्रमक फलंदाजी करत पुढे आणखी 39 धावा जोडल्या. जो रुटने जॉर्डन कॉक्ससोबत नाबाद शतकी भागीदारी रचली आणि नाबाद 62 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळून इंग्लंडला 8 गडी राखून सहज विजय मिळवून दिला.

काय म्हणाला बाबर आझम?

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप मिळाल्यानंतर बाबर आझम म्हणाला की, पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडचे 2 बळी घेतल्यावर आमचा विश्वास खूप वाढला होता, पण त्यानंतर जो रूट आणि जॉर्डन कॉक्स यांनी अत्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली. पाकिस्तानला कसोटी क्रिकेट पुन्हा स्पर्धात्मक बनवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? या प्रश्नावर बाबर आझम म्हणाला की, मला वाटतं की आपण एकत्र बसून आपल्या चुकांवर विचार करायला हवा, कोणत्या प्रकारचे प्लेइंग इलेव्हन असतील हे ठरवायला हवं. पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा स्पर्धात्मक बनवण्यासाठी आम्ही निवडक, मॅनेजर आणि मी स्वतः एकत्र बसून आमच्या चुकांवर चर्चा करू आणि भविष्यासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन ठरवू.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us