AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs PBKS Live Score, IPL 2021 : कर्णधार केएल राहुलची धमाकेदार खेळी, पंजाबचा पाच गडी राखून विजय

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 11:55 PM
Share

धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर आजचा सामना जिंकत पंजाब किंग्स संघानेही प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

KKR vs PBKS Live Score, IPL 2021 : कर्णधार केएल राहुलची धमाकेदार खेळी, पंजाबचा पाच गडी राखून विजय
सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 45 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघामध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. सामन्यात पंजाबने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब संघाने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर आता केकेआरचे खेळाडू फलंदाजीला आले. ज्यानंतर सलामीवीर व्यंकटेश अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावलं. त्याच्या 67 धावांसह राहुल त्रिपाठीच्या 34 आणि नितीश राणाच्या 31 धावांच्या जोरावर केकआरने 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यानंतर 166 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने आणि मयांकने उत्तम सुरुवात करुन दिली. मयांक 40 धावावंर बाद झाल्यानंतर राहुलने मात्र एकहाती खिंड लढवली. राहुल अखेरच्या षटकात 67 धावांवर बाद झाल्यानंतर शाहरुख खानने एक षटकार खेचत सामना पंजाबला 6 विकेट्सनी जिंकून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Oct 2021 11:35 PM (IST)

    KKR vs PBKS : पंजाबचा रोमहर्षक विजय

    166 धावांची गरज पंजाबला विजयासाठी असताना सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर झाल्यानंतर 4 चेंडूत 4 धावांची गरज असताना युवा फलंदाज शाहरुख खानने षटकार खेचत सामना केकेआरला जिंकवून दिला.

  • 01 Oct 2021 11:05 PM (IST)

    KKR vs PBKS : दीपक हुडा बाद

    पंजाबने आणखी एक गडी गमावला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर हुडा बाद झाला आहे. राहुल त्रिपाठीने त्याचा झेल घेतला आहे.

  • 01 Oct 2021 10:58 PM (IST)

    KKR vs PBKS : नारायणने बाद केलं मार्करमला

    केकेआरचा स्टार खेळाडू सुनील नारायणने मार्करमला बाद केलं आहे. गिलने त्याचा झेल घेतला आहे.

  • 01 Oct 2021 10:54 PM (IST)

    KKR vs PBKS : राहुलचं अर्धशतक पूर्ण

    पंजाबचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा कर्णधारी खेळी करत आहे. नुकतच त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. आता पंजाबला विजयासाठी 30 चेंडूत 45 धावांची गरज आहे.

  • 01 Oct 2021 10:31 PM (IST)

    KKR vs PBKS : वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू

    पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालची विकेट घेतल्यानंतर वरुण चक्रवर्तीने पूरनलाही बाद केलं आहे. पंजाबचे दोन गडी तंबूत परतले असून सध्या कर्णधार राहुल मार्करमसोबत फलंदाजी करत आहे.

  • 01 Oct 2021 09:44 PM (IST)

    KKR vs PBKS : पंजाबचे सलामीवीर मैदानात

    पंजाब किंग्सला विजयासाठी 166 धावांची गरज आहे. सध्या सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल मैदानात आळे आहेत.

  • 01 Oct 2021 09:19 PM (IST)

    KKR vs PBKS : अखेरच्या चेंडूवर कार्तिक बाद, 165 धावांपर्यंत मजल

    अखेरच्या चेंडूवर अर्शदीपने दिनेश कार्तिकला बोल्ड करत केकेआरचा डाव 165 धावांवर रोखला आहे.

  • 01 Oct 2021 09:12 PM (IST)

    KKR vs PBKS : शमीचा थ्रो, टीम सैफर्ट बाद

    मोहम्मद शमीने 19 व्या षटकात केकेआरच्या टीम सैफर्टला धावचीत केलं आहे. 19 ओव्हरनंतर केकआरचा स्कोर 158 वर 6 बाद झाला आहे.

  • 01 Oct 2021 09:04 PM (IST)

    KKR vs PBKS : अर्शदीपचं आणखी एक यश

    युवा अर्शदीपने आणखी एक विकेट घेत चांगल्या लयीत असणाऱ्या नितीश राणाला तंबूत धाडलं आहे. मयांकने राणाची कॅच घेतली आहे.

  • 01 Oct 2021 08:53 PM (IST)

    KKR vs PBKS : इयॉन मॉर्गन आजही FAIL

    केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन आजही स्वस्तात माघारी परतला आहे. केवळ दोन धावांवर मोहम्मद शमीने त्याला पायचीत केलं आहे.

  • 01 Oct 2021 08:49 PM (IST)

    KKR vs PBKS : बिश्नोईच्या फिरकीत अडकला व्यंकटेश

    केकेआरकडून तुफान खेळी करणारा व्यंकटेश अय्यरही बाद झाला आहे. रवी बिश्नोईच्या चेंडूवर दीपक हुडाने त्याचा झेल घेतला आहे.

  • 01 Oct 2021 08:30 PM (IST)

    KKR vs PBKS: त्रिपाठी बाद, व्यंकटेशचं अर्धशतक मात्र पूर्ण

    केकेआरचा दुसरा गडी राहुल त्रिपाठीच्या रुपात बाद झाला आहे. रवी बिश्नोईने त्याची विकेट घेतली आहे. तर दुसरीकडे सलामीवीर व्यंकटेशने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 01 Oct 2021 07:44 PM (IST)

    KKR vs PBKS: शुभमन गिल बाद

    केकेरआचा सलामीवीर शुभमन गिल पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगच्या चेंडूवर बाद झाला आहे. गिल 7 धावा करुन बाद झाला आहे.

  • 01 Oct 2021 07:10 PM (IST)

    KKR अंतिम 11

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, टीम सॅफर्ट, सुनील नारायण, शिवम मावी, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.

  • 01 Oct 2021 07:07 PM (IST)

    PBKS अंतिम 11

    केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, एडन मार्करम, दीपक हुडा, शाहरुख खान, फॅबियन अॅलिन, नथॅन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

  • 01 Oct 2021 07:06 PM (IST)

    KKR vs PBKS : पंजाबने निवडली गोलंदाजी

    नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे केकेआर प्रथम फलंदाजीला येणार आहे.

  • 01 Oct 2021 07:04 PM (IST)

    ख्रिस गेलची आयपीएलमधून माघार

    प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना पंजाब संघाला सामन्यापूर्वीच एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने संपूर्ण आय़पीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बायोबबलमधून स्वत:ला विश्रांती देण्यासाठी तसेच आगामी टी20 विश्व चषकात वेस्टइंडीज संघाकडून चांगली कामगिरी करण्याकरता स्वत:ला वेळ देत असल्याचे कारण गेलने दिले आहे.

Published On - Oct 01,2021 7:03 PM

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?