AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS ची परीक्षा पास झालेला भारतीय संघातील खेळाडू कोण?

हिंदीमध्ये एक म्हण आहे 'खेलोगे कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे, लिखोगे तो बनोगे नवाब...!'  पण भारतीय संघात असा एक क्रिकेटर होता की तो खेळण्यातही पुढे होता आणि अभ्यासातही! त्याचं नाव अमय खुरासिया... (left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)

IAS ची परीक्षा पास झालेला भारतीय संघातील खेळाडू कोण?
अमेय खुरासिया
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 19, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई :  हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘खेलोगे कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे, लिखोगे तो बनोगे नवाब…!’  पण भारतीय संघात असा एक क्रिकेटर होता की तो खेळण्यातही पुढे होता आणि अभ्यासातही!  त्याने केवळ पदवीच संपादन केली नाही तर त्याने देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी IAS परीक्षा पास केली. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात एन्ट्री केली. या खेळाडूचं नाव आहे अमय खुरासिया (Amay Khurasiya). 90 च्या दशकात तो भारतीय संघासाठी क्रिकेट खेळायचा… (left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)

IAS परीक्षा पास, मोठ्या पदावर नियुक्ती

अमय खोरासियाचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. तो डावखुरा फलंदाज होता. त्याच्याकडे जलद धावा करण्याची कला होता. परंतु भारतीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने आयएएस परीक्षा पास केली आणि भारतीय सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक पदावर त्याची नेमणूक झाली.

1989-1990 च्या हंगामापासून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, तो 2004-2005 च्या हंगामापर्यंत खेळत राहिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी त्याने 119 प्रथम श्रेणी सामन्यात 40.80 च्या सरासरीने 7304 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 238 धावा होती. प्रथम श्रेणीत त्याने 21 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. 1990-91, 1991-92 आणि 2000-01 प्रथम श्रेणी हंगामात त्याने 500 हून अधिक धावा फटकावल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या बॉलवर चौकार, पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक

खुरासियाने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पेप्सी चषक स्पर्धेत भारताकडून एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दुसर्‍याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर 45 चेंडूत 57 धावांची त्याने खेळी केली. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारा तो आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. पेप्सी कपमधील कामगिरीमुळे त्याला 1999 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले. पण त्याला खेळायची संधी मिळाली नाही.

कालांतराने त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र 2001 मध्ये अमय खुरासियाने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवलं. या वेळी पुन्हा श्रीलंकेविरुद्ध त्याला संधी मिळाली पण त्याची बॅट त्यावेळी बोलली नाही. त्यानंतर मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही.

12 वनडे सामने खेळून करिअर संपवलं

अमय खुरासियाने भारताकडून 12 एकदिवसीय सामने खेळले. त्याने 1999 मध्ये यापैकी 10 सामने खेळले. 13.54 च्या सरासरीने त्याने 149 धावा केल्या. जेव्हा खुरासिया निवृत्त झाला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकला नाही, याची खंत त्याच्या मनात होती. 2007 मध्ये त्याने क्रिकेटला गुड बाय केलं. यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि कॉमेंट्रीमध्ये आपली नवी इनिंग सुरु केली.

(left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)

हे ही वाचा :

9 वर्षांत 4 डाव खेळला, चारही डावांत धडाकेबाज शतकं, ‘तोच’ संयमी पण तितकाच आक्रमक बॅट्समन कोण?

WTC फायनलमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार कोण पटकवणार?, 3 खेळाडू शर्यतीत, एका भारतीय खेळाडूची दावेदारी!

Team India ची डोकेदुखी ठरलेल्या Tim Southee ने पुन्हा चेतवलं, WTC फायनलअगोदर थेट कोहलीला इशारा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या