वेलकम टू द किंग, धोनी टीम इंडियासोबत नव्या भूमिकेत, मैदानात कामालाही लागला !

लाखो क्रिकेट चाहत्यांचा जीव की प्राण असलेला 'माही' आज पुन्हा मैदानात दिसला. तो टी-ट्वेंटी विश्वचषकात टीम-इंडियासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे. या भूमिकेसाठी तो मैदानात कामाला देखील लागला आहे.

1/4
भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनेक सुवर्णक्षणांचा अनुभव देणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता  वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर तो टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत मैदानात खेळताना दिसणार नाही. पण तो मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना कित्येक मोलाचे सल्ले देणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्तृत्वाचा टीम इंडियाला पुन्हा एकदा फायदा होणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनी आता या विश्वचषकात टीम इंडियासाठी मेन्टॉरची भूमिका निभावणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका निभावण्यासाठी तो मैदानात कामाला सुद्धा लागला आहे.

2/4
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाच्या जर्सीत दिसत आहे. या फोटोत महेंद्रसिंगसह इतर ज्येष्ठ आजी-माजी खेळाडूदेखील आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झालीय. याच दिवशी टीम इंडियादेखील मैदानात सराव करताना दिसली. बीसीसीआयने ट्विट केलेल्या फोटोत टीम इंडियाचे शिलेदार मैदानावार सरावासाठी जमल्याचं बघायला मिळालं. या ट्विटसोबत बीसीसीआयने जे कॅप्शन दिलंय त्यामध्ये धोनीचा उल्लेख 'किंग' असा केला आहे. किंगचं टीम इंडियात आम्ही स्वागत करतोय, असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे.

3/4
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात आयपीएलमध्ये चेन्नईने नुकतीच जशी बाजी मारली ते पाहिल्यानंतर धोनी आणखी काही वेळ टीम इंडियात कार्यरत राहायला हवा होता, अशी इच्छा हजारो क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. विशेष म्हणजे धोनीने 74 व्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पण त्याच्या कौशल्याचा विचार करुन अखेर बीसीसीआयने धोनीला पुन्हा टीम इंडियात महत्त्वाची जबाबदारी दिली. तो टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी मेन्टॉरची भूमिका निभावत आहे. त्यासाठी तो कामाला देखील लागला आहे.

4/4
टी-ट्वेंटी स्पर्धेत भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी भारताचे दोन सराव सामने होणार आहेत. विशेष म्हणजे टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताने 15 खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी 7 भारतीय खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग असतील. म्हणजेच, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये त्यांचे पदार्पण दिसेल. त्या 7 भारतीयांपैकी चौघांचे पदार्पण 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे होईल, अशी शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI