पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की; इंग्लंडच्या दिग्गजाने जाहीरपणे उडवली खिल्ली!

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि दुसर्‍या सामन्यातही विजय अपेक्षित आहे. असं असताना इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तान संघाची पुरती लाज काढली आहे.

पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की; इंग्लंडच्या दिग्गजाने जाहीरपणे उडवली खिल्ली!
पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की; इंग्लंडच्या दिग्गजाने जाहीरपणे उडवली खिल्ली!
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 29, 2026 | 4:04 PM

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. 27 ऑगस्टला या सामन्याला सुरूवात झाली असून तिसऱ्या दिवशीच पाकिस्तानचा संघ नाजूक स्थितीत आहे. इंग्लंडने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात इंग्लंडने 290 धावांची खेळी केली होती. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 110 धावा करू शकला. यासह पहिल्या डावात इंग्लंडकडे 180 धावांची मजबूत आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने या धावसंख्येत 3 गडी गमवून 81 धावांची भर घातली . त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईपर्यंत इंग्लंडच्या खात्यात 261 धावा असून हा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकलेला आहे. त्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पाकिस्तान संघावर बोचरी टीका केली आहे.

मायकल वॉनने पाकिस्तानच्या फलंदाजांची तुलना सेकंड डिव्हिजन काउंटी क्रिकेटशी केली आहे. वॉन म्हणाला की, ‘मी सर्वकाही प्रामाणिकपणे सांगेन. इंग्लंडच्या गोलंदाजांना जराही आव्हान मिळताना दिसत नाही. पाकिस्तान बॅटिंग लाइनअप कदाचित सर्वात सोपी बॅटिंग लाइनअप आहे. मला वाटतं की एक गोलंदाज म्हणून सर्व गोलंदाज गोलंदाजीसाठी रांगेत आहेत. त्याने माहिती आहे की येथे विकेट मिळणार आहे. ओली रॉबिन्सन, जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांची पाकिस्तानची फलंदाजी उद्ध्वस्त केली आहे.’

मायकल वॉनने पुढे सांगितलं की, ‘मला वाटते की त्या सर्वांना माहिती आहे की पाकिस्तान फार काही मोठी धावसंख्या उभारणार नाही. यासाठी फक्त 40 ते 50 षटकांसाठी मैदानात राहावं लागेल. यासाठी प्रत्येक जण आपल्या स्पेलमध्ये सर्वकाही देण्याचा प्रयत्न करत आहे. जो रूटकडे जाऊन प्रत्येक जण सांगत असेल की एक आणखी षटक टाकू का. तिथे खूप सारे विकेट आहेत.’

मायकल वॉनने इंग्लंड संघावर स्तुतीसुमनं उधळत असताना पाकिस्तानची लाच काढली. मायकल वॉन म्हणाला की, ‘ आपण दुसऱ्या श्रेणीतील काउंटी क्रिकेटबद्दल बोलत आहोत का? ही फलंदाजी कोणत्याही प्रकारे कसोटी सामन्याच्या पातळीची वाटत नाही.’

Follow Us