मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आपल्या बॅटिंगने तर चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीसोबतच्या अनेक रोमँटिक फोटोमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनाही विशेष भावली आहे. (Natasa Stankovic kiss Hardik pandya in swimming pool Photo Viral)
हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.
नताशाने शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय. याच फोटोत ती हार्दिकला किस करताना दिसून येत आहे. हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना तिने कॅप्शन दिलंय, “मेरा सनशाईन हार्दिक पांड्या…”
View this post on Instagram
नशानाने शेअर केलेल्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. अनेकांनी दोघांना शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या रोमँटिंक अंदाजाची तारीफ केली आहे.
हार्दिक आणि नताशा हे सेलिब्रेटी कपल आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे ही जोडी चर्चेत असते. गेल्याच वर्षी त्यांनी एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.
पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकने आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. त्याने 16 चेंडूवर 35 धावा ठोकल्या. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हार्दिकने इंग्लंडच्या डावादरम्यान गोलंदाजी केली नाही.
हे ही वाचा :