ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडने इंग्लंडसोबत खेळलेल्या सराव कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर 'हा' लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की
james anderson in team
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 7:04 PM

बर्मिंघम : न्यूझीलंड आणि इंग्लंड (ENG vs NZ) यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका नुकतीच पार पडली. यात पहिल्या सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ 8 विकेट्सने पराभूत झाला. दरम्यान हा सामना इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी (James Anderson) अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण हा इंग्लंडच्या संघाकडून त्याचा 162 वा कसोटी सामना होता. त्यामुळे सामना सुरु होताच त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार एलेस्टर कुकचा (Alastair Cook) सर्वाधिक 161 कसोटी सामने इंग्लंडकडून खेळल्याचा रेकॉर्ड तोडला. पण सामन्यात पराभवानंतर इंग्लंडच्या संघाकडून सर्वाधिक सामन्यांत पराभूत होण्याचा लाजिरवाणा रेकॉर्डही अँडरसनच्या नावे झाला आहे. (New Zealand beat England James Anderson Records Most test defeats for England)

162 कसोटी सामन्य़ांच्या कारकिर्दीत जेम्स अँडरसनला संघातून खेळताना 56 व्या वेळेस पराभवाचा सामना करावा लागला. याआधी माजी कर्णधार एलेस्टर कुकला 161 सामन्यांत 55 पराभव पाहावे लागले होते. त्याचा हा रेकॉर्ड तोडत अँडरसन पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्यासोबतच इंग्लंडचे माजी विकेटकीपर एलेक स्टीवर्ट (Alec Stewart) यांनी 133 कसोटी सामन्यांत 54 वेळा पराभव स्वीकारला आहे. तर स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) 148 टेस्टमध्ये 47 वेळा पराभव पाहिला आहे.

असा झाला सामना

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 303 धावा केल्या, ज्याच्या उत्तरात न्यूझीलंडने 388 धावा करत 85 धावांची लीड घेतली. ज्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडला अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट केले. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 38 धावांची गरज होती. जी न्यूझीलंडने 10.5 ओव्हरमध्ये दोन विकेटच्या बदल्य़ात पूर्ण करत सामना आपल्या नावे केला.

गोलंदाज ठरले विजयाचे शिल्पकार

इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावांवर आटोपल्यामुळेच न्यूझीलंडला विजय मिळवणे सोपे झाले. दरम्यान न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात मॅट हेन्री आणि नील वेगनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले ज्यामुळे इंग्लंडचा डाव लवकर आटोपला. त्याचसोबत ट्रेंट बोल्ट आणि एजाज पटेल यांनी दोन-दोन विकेट पटकावले.

हे ही वाचा :

WTC Final पूर्वी न्यूझीलंडचं शक्तिप्रदर्शन, इंग्लंडवर 8 विकेट्सने मात करत मालिकाविजय

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(New Zealand beat England James Anderson Records Most test defeats for England)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.