आता महिला क्रिकेटपटूंना मासिक मानधन; महानआर्यमन सिंधिया यांचा मास्टरस्ट्रोक, इतर बोर्ड निर्णय घेणार का?
Mahan Aryaman Scindia Big Decision: महिला क्रिकेटपटूंसाठी मासिक मानधन योजना सुरू करण्याचा निर्णय महानआर्यमन सिंधिया यांनी घेतला. त्यांच्या निर्णयामुळे महिला क्रिकेटपटूंमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. इतर राज्य क्रिकेट बोर्ड असा निर्णय घेतील का अशी विचारणा केली जात आहे.

Monthly Incentive money for women cricketers :महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. महानआर्यमन सिंधिया यांनी याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महिला क्रिकेटपटूंना मासिका प्रोत्साह रक्कम देण्यात येणार आहे. MPCA त्यांच्या सर्व माजी क्रिकेटपूटंना मासिक आर्थिक प्रोत्साहन रक्कम देणारा आहे. या स्तुत्य निर्णयाचे महिला क्रिकेट जगतातून स्वागत होत आहे. प्रोत्साहन रक्कम ही क्रिकेटमधील कारकिर्द आणि खेळाडूंच्या श्रेणीनुसार ठरवण्यात आली आहे. ज्या महिला क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) च्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना या योजनेचा विशेष लाभ होईल. तर महिला क्रिकेट खेळाडूंना असे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांची कामगिरी अधिक जोरदार दिसेल. त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल.
अशी आहे ही योजना
भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावलेल्या महिला क्रिकेटपटूंना प्रतिमाह 12,500 रुपये मानधन
देशातंर्गत स्तरावर कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना प्रतिमाह 6,000 ते 10,000 रुपये मानधन
तर 75 वर्षांवरील महिला खेळाडूंना 7,500 रुपये मानधन देण्यात येईल
ही योजना या 1 एप्रिल 2026 रोजीपासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयाने वेधले लक्ष
मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनने पुरुष क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे.
पुरूष क्रिकेटपटू ज्यांना BCCI पेन्शन मिळत नाही अशासाठी
1-4 सामने : 7 हजार रुपये प्रतिमाह
5-14 सामने : 10,000 रुपये प्रतिमाह
15-24 सामने : 12,000 रुपये प्रतिमाह
पंचांना किती मानधन मिळणार?
BCCI स्तरावरील निवृत्त पंच : 10,000 रुपये प्रति महिना
राज्य स्तरावरील पंच : 6,500 रुपये प्रति महिना
75 वर्षांवरील पंचांसाठी : 7,500 रुपये प्रति महिना
तर इंटर डिव्हिजन सामन्याच्या पंचासाठी 5 हजार रुपये प्रति महिना
स्कोअररसाठी 2,500 रुपये प्रति दिवस मानधन
निवड समिती सदस्याला 9,000 रुपये मानधन
तर प्रशिक्षकांच्या प्रोत्साहन रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे
महानआर्यमन सिंधीया म्हणाले काय?
माजी महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्या काळात या खेळाचा विकास केला. जेव्हा सुविधा, ओळख आणि समर्थन नव्हते तेव्हा त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे महानआर्यमन सिंधीया म्हणाले. ही योजना सर्वसमावेशक आहे. अर्ज आधारीत पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. गरजू खेळांडूना निश्चितपणे त्याचा लाभ होईल.