AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK 1st Odi : पाकिस्तानची हाराकिरी सुरुच, न्यूझीलंडकडून 73 धावांनी धुव्वा, किवींची विजयी सलामी

New Zealand vs Pakistan 1st Odi Match Result : यजमान न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानचा 73 धावांनी धुव्वा उडवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

NZ vs PAK 1st Odi : पाकिस्तानची हाराकिरी सुरुच, न्यूझीलंडकडून 73 धावांनी धुव्वा, किवींची विजयी सलामी
new zealand vs pakistan 1st odi match resultImage Credit source: blackcaps x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 29, 2025 | 4:20 PM
Share

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान टीमने टी 20i नंतर एकदिवसीय मालिकेतही पराभवाने सुरुवात केली आहे. पाकिस्तानने यशस्वीरित्या पराभवाची मालिका कायम राखत एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. नॅपियरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानला 44.1 ओव्हरमध्ये 271 रन्सवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.

पाकिस्तानची बॅटिंग

पाकिस्तानच्या टॉप 5 फलंदाजांना शानदार बॅटिंग केली. पाकिस्तानच्या या 5 फलंदाजांच्या खेळीमुळे सामना बरोबरीत होता. मात्र त्यानंतरच्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 5 पैकी दोघांना भोपळाही फोडू दिला नाही. तर तिघे प्रत्येकी 1-1 धाव करुन बाद झाले. पाकिस्तानसाठी बाबर आझम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बाबरने 83 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 78 रन्स केल्या. सलमान आघा याने 48 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 58 धावा केल्या. तर उस्मान खान 39, अब्दुल्लाह शफीक याने 36 आणि कॅप्टन मोहम्मद रिझवान याने धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर अवघ्या काही धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. इरफान खान आणि नसीम शाह या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर तय्यब ताहीर, हरीस रौफ आणि अकिफ जावेद या तिघांनी प्रत्येकी 1-1 धावा केली. तर मोहम्मद अली नॉट आऊट राहिला. न्यूझीलंडसाठी नॅथन स्मिथ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेकब डफी याने दोघांना बाद केलं. तर विलियम ओरुर्के, मायकल ब्रेसवेल आणि मुहम्मद अब्बास या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडसाठी मार्क चॅपमन याने शतकी खेळी केली. तर मुहम्मद अब्बास आणि डॅरेल मिचेल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. चॅपमॅन याने 111 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 13 फोरच्या मदतीने 132 रन्स केल्या. डॅरेल मिचेल याने 76 आणि मोहम्मद अब्बासने 52 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 344 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : निक केली, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मुहम्मद अब्बास, मिचेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, जेकब डफी आणि विल्यम ओरोर्क.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: अब्दुल्ला शफीक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सलमान आघा, तैयब ताहिर, इरफान खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अली आणि अकिफ जावेद.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?