पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच…! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या

पाकिस्तान क्रिकेटची पुरती वाट लागली आहे. एक काळ पाकिस्तान क्रिकेटने गाजवला आहे. पण आता पाकिस्तान क्रिकेट संघाची सुमार संघ म्हणून गणना होत आहे. पाकिस्तानचा संघच नाही तर कोचिंग स्टाफमध्येही कोणी टिकत नाही.

पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच...! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या
पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच...! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 02, 2026 | 5:46 PM

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद आता काही नवीन राहिलं नाही. पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात सुधारणाच झालेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुमार दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे. पाकिस्तान संघाची इंग्लंडमधील कामगिरी पाहून तसंच म्हणावं लागेल. पाकिस्तानची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुरती नाचक्की झाली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामना होण्यापूर्वीच मालिका हातून गेली आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळलेला अर्धा संघ घरी पाठवला आहे आणि नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. इतकंच काय तर कोचिंग स्टाफमध्येही बदल करण्यात आला आहे. सरफराज अहमदला कोच म्हणून हटवण्यात आलं असून वनडे आणि टी20 संघाचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मागच्या तीन वर्षात कसोटी कोचिंगमध्ये हा सहावा आणि पाच वर्षात सर्व फॉर्मेटमधील 11 वा बदल आहे.

वारंवार बदलले कसोटी प्रशिक्षक

पाकिस्तान क्रिकेटचा स्तर मागच्या पाच सहा वर्षात कमालीचा घसरला आहे. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये तर वाताहत झाली आहे. बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाने पाकिस्तानला दोन कसोटी मालिकेत क्लिन स्विप दिला. यात एक तर पाकिस्तानात खेळलेल्या मालिकेत दिला गेला. तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडसारख्या देशात पाकिस्तानची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कोचिंग स्टाफमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. इतके बदल करूनही रिझल्ट काही मिळताना दिसत नाही. त्यामुळे हा कित्ता गेल्या पाच सहा वर्षांपासून सुरूच आहे. 2023 पासून पाकिस्तानने सहा वेळा प्रशिक्षक बदलला आहे.

मार्च 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत ग्राँट ब्रॅडबर्न कसोटी कोच होते. त्यानंतर पुढची धुरा मोहम्मद हाफिजच्या खांद्यावर टाकली गेली. पण त्यांचा कार्यकाळही जास्त काळ टिकला नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना या पदावरून पायउतार व्हावं लागलं. एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत जेसन गिलेस्पीने धुरा सांभाळली. पण हवा तसा रिझल्ट आला नाही. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मध्ये अजहर महमूद यांच्याकडे जबाबदारी होती. मग त्यांच्याकडून ही धुरा सरफराज अहमद यांच्याकडे आली. त्यांनी एप्रिल 2026 ते ऑगस्ट 2026 इथपर्यंत धुरा सांभाळली. आता सप्टेंबर 2026 पाहून माइक हेसन यांचा कार्यकाळ सुरू झाला आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी किती काळ राहिल हे काय सांगता येत नाही.

मागच्या पाच वर्षात पाकिस्तानने सर्व फॉर्मेटमध्ये एकूण 11 वेळा प्रशिक्षक बदलला. याची सुरूवात 2021 मध्ये झाली होती. त्यांचा कार्यकाळ इतर प्रशिक्षकांच्या तुलनेत अधिक होता. त्यानंतर सकलेन मुश्ताक दोन वर्षे सर्व फॉर्मेटचा कोच राहिला. मग मोहम्मद हफीज, गॅरी कर्स्टन आणि आकिब जावेद यांनीही धुरा सांभाळली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us