टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी मिळाली, आता पगार किती मिळणार? आकडा पाहून व्हाल थक्क!
अजित आगरकर यांच्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्याकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठी त्यांना किती पगार मिळणार? जाणून घेऊयात....

गेल्या अनेक दिवसांपासून बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या जागी नव्या व्यक्तीच्या निवडीची चर्चा सुरु होती.
त्यानंतर आता आज १९ ऑक्टोबर २०२६ रोजी बीसीसीआयने यासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. अजित आगरकरांनी पद सोडल्यानंतर त्यांच्याजागी माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य निवडकर्ता म्हणून काम करणाऱ्या पदाच्या पगारामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांप्रमाणेच प्रज्ञान यांनाही पगार मिळणार आहे.
दरम्यान, माजी भारतीय फिरकीपटू रमेश पवार यांचीही निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या ५ सदस्यीय समितीमध्ये प्रज्ञान ओझा, शिवसुंदर दास, आर. पी. सिंह, अजय रात्रा आणि रमेश पवार यांचा समावेश आहे. अजित आगरकर यांच्याप्रमाणेच प्रज्ञान ओझा यांना वर्षाला ३ कोटी रुपये वार्षिक पगार म्हणजे २५ लाख प्रति महिना मिळणार आहे.
दरम्यान, आता प्रज्ञान ओझा मुख्य निवडकर्ता म्हणून समितीचे नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्यासोबत इतर चार सदस्य असणार आहेत. निवड समितीत प्रज्ञान ओझा (अध्यक्ष/मुख्य निवडकर्ता), शिव सुंदर दास, आरपी सिंग, अजय रात्रा आणि रमेश पवार यांचाही समावेश आहे. या सर्वांना खेळाडू म्हणून मोठा अनुभव असून, भारतीय संघाचे भविष्य आता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे पुढे आता संघाची कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रज्ञान ओझांची कारकीर्द कशी ?
३८ वर्षीय प्रज्ञान ओझा यांनी भारतासाठी २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून एकूण १४४ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. मुख्य निवडकर्ता म्हणून, आगामी आयसीसी स्पर्धा आणि परदेश दौऱ्यांसाठी एक मजबूत राखीव खेळाडूंचा संघ तयार करणे, हे त्याचे मुख्य लक्ष असणार आहे. दरम्यान, प्रज्ञान ओझा आणि रमेश पवार ही जोडी भारतीय फिरकी गोलंदाजी मजबूत करण्यात आणि युवा प्रतिभेला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.