BCCI च्या निवड समितीत मोठा बदल! नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नावाची घोषणा; ‘यांच्यावर’ दाखवला विश्वास, रमेश पोवारांवरही मोठी जबाबदारी

Pragyan Ojha Named Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

BCCI च्या निवड समितीत मोठा बदल! नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नावाची घोषणा; यांच्यावर दाखवला विश्वास, रमेश पोवारांवरही मोठी जबाबदारी
| Updated on: Oct 19, 2026 | 5:47 PM

बीसीसीआयने अखेर आपल्या नवीन मुख्य निवडकर्त्याची निवड केली आहे. अजित आगरकर यांच्यानंतर प्रज्ञान ओझा यांची नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला ओझा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता या माजी क्रिकेटपटूची पूर्णवेळ मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटपटू वसीम जाफर, रमेश पोवार, कॉनर विल्यम्स आणि जेकब मार्टिन यांनीही टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता होण्यासाठी अर्ज केला होता. परंतु कोणाचीही निवड झाली नाही. बीसीसीआयने प्रज्ञान ओझा यांची निवड करणे आवश्यक मानले. बीसीसीआयने सोमवारी ही अधिकृत घोषणा केली आहे. रमेश पोवार यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे. मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेट सल्लागार समितीने पुरुष निवड समितीच्या सदस्याच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. बीसीसीआयच्या मुख्यालयात अर्जदारांची छाननी आणि मुलाखती घेण्यात आल्या. ज्यानंतर त्यांनी एकमताने पोवार यांच्या नियुक्तीची शिफारस केली.

Loading...

प्रज्ञान ओझा आता टीम इंडियाच्या नवीन निवड समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत शिव सुंदर दास, आरपी सिंग, अजय रात्रा आणि रमेश पवार हे देखील निवड समितीचे नवीन सदस्य असतील. प्रज्ञान ओझाच्या कारकिर्दीबद्दलची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, सामनावीर म्हणून गौरवण्यात आले असूनही त्याची कारकीर्द सचिनच्या शेवटच्या सामन्यातच संपली. १६ नोव्हेंबर रोजी वानखेडेवर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एक डाव आणि १२६ धावांनी विजय मिळवला.

हा सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. ज्यात त्याने निवृत्ती घेतली होती. या सामन्यात प्रज्ञान ओझाने एकूण १० बळी घेतले. त्याने दोन्ही डावांत प्रत्येकी ५ बळी घेतले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण या सामन्यानंतर त्याची कधीही निवड झाली नाही. याचे कारण कोणालाच माहीत नाही, पण प्रज्ञान ओझाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक संपुष्टात आली. पण आज हा माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता बनला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us