AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच ‘हा’ फलंदाज मैदानावर उडवतोय धुरळा, 7 षटकार ठोकत संघाला मिळवून दिला विजय

जगातील धमाकेदार क्रिकेट लीग आयपीएलला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्वच क्रिकेट रसिक कमालीचे उत्सुक असून खेळाडू देखील मध्येच थांबवण्यात आलेली स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच 'हा' फलंदाज मैदानावर उडवतोय धुरळा, 7 षटकार ठोकत संघाला मिळवून दिला विजय
निकोलस पूरन
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बहुतेक खेळाडू युएईला पोहचले असून अनेकांनी सरावही सुरु केला आहे. तर आयपीएलमधील सर्वात मोठे मनोरंजनकार असणारे वेस्ट इंडिजचे  खेळाडू अजून सीपीएल (CPL 2021) खेळत असून त्याठिकाणी आयपीएलपूर्वी आपल्या धमाकेदार खेळीचं प्रदर्शन करत आहेत. यातीलच एक खेळाडू निकोलस पूरनने (Nicholas Pooran ) देखील नुकतीच एक धमाकेदार खेळी खेळली. आय़पीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघातून मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असणारा पूरन CPL  मध्ये गुयाना वॉरियर्सचा कर्णधार आहे

जमायका थलावाज विरुद्ध गुयाना वॉरियर्स यांच्यातील सामन्यात पूरनच्या धमाकेदार खेळीने वॉरियर्सच्या संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुयाना वॉरियर्सने 20 षटकांत 6 विकेटंच्या बदल्यात 169 धावा केल्या. हा स्कोर उभा करण्यात कर्णधार निकोलस पूरनची महत्त्वाची भूमिका होती. पूरनने  64 मिनिटं फलंदाजी करत नाबाद खेळी केली. पूरनने प्रतिस्पर्धी संघातील सर्वच खेळाडूंना सळो की पळो केलं.

39 चेंडूत सामना जिंकवणारी खेळी

निकोलस पूरनने 64 मिनिटांत 39 चेंडूचा सामना केला. यावेळी त्याने नाबाद 75 धावा केल्या ज्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 192.30 इतका असून या डावात केवळ चारच चौके होते. पण षटकार मात्र सात होते. ज्यामुळे त्याच्या 75 धावांपैकी 58 धावा या त्याने 11 चेंडूत चौकार आणि षटकार ठोकत केल्या.

46 धावांनी विजय

गुयाना वॉरियर्सने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना जमायका थलावाजचा संघ खास कामगिरी करु शकला नाहीय त्यांच्याकडून केवळ सलामीवीर मॅकेन्जी याने सर्वाधिक म्हणजेच 28 धावा केल्या. ज्यानंतर एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि सर्व संघ 123 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे गुयाना वॉरियर्स 46 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयासह पूरनने त्याच्या संघाला बाद फेरीजवळ पोहोचवलं आहे. दरम्यान आयपीएलच्या पहिल्या पर्वात खास कामगिरी करु न शकणारा पूरन आता सीपीएलप्रमाणे आयपीएलच्या उर्वरीत पर्वात ही धमाकेदार कामगिरी करेल अशी अपेक्षा पंजाबचे फॅन्स व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा :

Manchester Test : ‘त्या’ रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं

इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?

IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार

(Punjab kings nicholas pooran awsome batting in CPL 2021 before stariting IPL 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.