AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Card in Cricket : फुटबॉलनंतर क्रिकेटमध्ये रेड कार्डची एन्ट्री, या खेळाडूला क्रिकेट इतिहासातील पहिलं रेड कार्ड!

First Ever Red Card Issued In Cricket History | क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलं रेड कार्ड, क्रिकेटमध्ये नेमका कसा आहे रेड कार्डचा नियम? खेळाडूला जावं लागणार मैदान सोडून की पूर्ण सामन्यातून आऊट जाणून घ्या.

Red Card in Cricket : फुटबॉलनंतर क्रिकेटमध्ये रेड कार्डची एन्ट्री, या खेळाडूला क्रिकेट इतिहासातील पहिलं रेड कार्ड!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 28, 2023 | 7:16 PM
Share

मुंबई : रेड कार्ड म्हटलं की सर्वांना फुटबॉल आठवतो, रेड कार्ड म्हटलं की संंबंधित खेळाडूला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सामन्याबाहेर जावं लागतं. आता हेच रेड कार्ड क्रिकेट या खेळामध्ये आलं आहे. इतकंच नाहीतर या रेड कार्डचा एक खेळाडू शिकार ठरला आहे. हा रेड कार्डचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाहीतर प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये लागू करण्यात आला आहे.

या लीगमध्ये आलाय रेड कार्डचा नियम-

वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जात आहे. या वर्षी या लीगमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे ‘ रेड कार्ड ‘. फुटबॉलप्रमाणे आता ‘सीपीएल’मध्ये रेड कार्डचा वापर केला गेलाय. त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स नेविस या दोन संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात नियमांचं उल्लंघन केल्याने अंपायर्सकडून रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे नाइट रायडर्स संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 खेळाडूंसह खेळायला लागलं. याप्रकरणी त्रिनिबागो नाइट रायडर्सचा कर्णधार कायरन पोलार्ड याने अंपायरने दिलेल्या रेडकार्डच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

या क्रिकेटरवर क्रिकेट इतिहासातील पहिलं रेड कार्ड

त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स नेविस यांच्यात सुरु असलेल्या सीपीएल 2023 मधील सामन्या दरम्यान, पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या त्रिनिबागो नाइट रायडर्स या संघाने निर्धारित वेळेच्या आधी 19 ओव्हर टाकून पूर्ण न केल्याने सीपीएल मधील नवीन नियमानुसार 20व्या ओव्हरमध्ये अंपायर्सद्वारे रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड दाखवल्याने 20व्या ओव्हरमध्ये केवळ 10 खेळाडूचं मैदानात राहू शकतात. अशी परिस्थिती उद्भवली असता कर्णधार कायरन पोलार्डनं सुनील नारायणला बाहेर जाण्यास सांगितलं. त्यामुळे सुनील नारायण हा रेडकार्ड लागू झालेला क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू बनला आहे.

याआधी होता असा नियम-:

सामना निर्धारित वेळेत पू्र्ण व्हावा यासाठी आयसीसीने काही नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू केले आहेत.  जर गोलंदाजी करत असलेल्या संघाने निर्धारित वेळेच्या आधी 19 ओव्हर टाकून पूर्ण केल्या नाहीत तर, 20 व्या ओव्हरमध्ये 5 ऐवजी केवळ 4 फिल्डरचं सीमारेषेवर ठेवता येतात. तर अनेकदा कर्णधारांच्या मॅच फी मधील काही टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते.

दरम्यान, आता सीपीएलमध्ये फुटबॉलप्रमाणे रेड कार्ड दाखवण्यात आलेलं आहे. तर सुनील नारायण हा क्रिकेट विश्वातील पहिला रेड कार्ड लागू झालेला खेळाडू ठरला आहे. अशा प्रकारचे नियम सीपीएलनंतर आयसीसी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू करु करणार की नाही? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी