AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Car Accident : “डुलकी लागली आणि डिव्हायडरला कार धडकली..”, पंतने स्वत: सांगितलं कसा झाला अपघात

ऋषभ पंतने (Rishabh Pant) या अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Rishabh Pant Car Accident : डुलकी लागली आणि डिव्हायडरला कार धडकली.., पंतने स्वत: सांगितलं कसा झाला अपघात
rishab pant car accidentImage Credit source: सोशल मीडिया
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 03, 2023 | 5:10 PM
Share

Rishabh Pant Car Accident : टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला शुक्रवारी भल्या पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंतला जबर दुखापत झाली. हा अपघात 30 डिसेंबरला रुडकीतील गुरुकुल नारसन ईथे झाला. अपघातानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावली अन् पंतला रुग्णालयात दाखल करण्यात मोठी मदत केली. पंत दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. या अपघातानंतर पंतने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात नक्की कसा झाला, गाडीतून बाहेर कसा निघालो, याबाबत स्वत: पंतने माहिती दिली आहे. जर पंत वेळीच गाडीतून बाहेर निघाला नसता तर मोठा अनर्थ झाला असता, कारण अपघातानंतर गाडीने पेट घेतला होता. (rishabh pant 1st statment after his car accident on delhi deharadun highway)

पंत काय म्हणाला?

“कार मी स्वत: चालवत होतो. ड्रायव्हिंग करताना मला डुलकी लागली. यामुळेच गाडी डिव्हायडरला धडकली आणि मोठा अपघात झाला. तसेच अपघातानंतर विंडो स्क्रीन तोडून मी बाहेर निघालो”, अशी प्रतिक्रिया पंतने दिली.

पंतच्या डोक्याला मार

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या शरीराला फार दुखापत झालेली नाही. मात्र त्याच्या डोक्याला मार लागला. तर पायाला फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या पंतवर उपचार सुरु आहे. या दुखापतीमुळे पंतला किमान 6 महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागू शकतं.

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी) सुरुवात होत आहे. एकूण 3 सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टी 20 मालितेनंतर 3 मॅचची वनडे सीरिज पार पडणार आहे.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...