टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; BCCI कडून रिप्लेसमेंटची घोषणा, कोणाला मिळाली संधी?

Rishabh Pant Ruled Out: पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; BCCI कडून रिप्लेसमेंटची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
| Updated on: Oct 12, 2026 | 11:28 PM

बीसीसीआय आणि पुरुष निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या भारत ‘अ’ संघात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला डाव्या बाजूच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघात पंतच्या जागी युवा आणि प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्रला स्थान दिले आहे.

नुकतेच इराणी कप सामन्यादरम्यान ‘रेस्ट ऑफ इंडिया’चे कर्णधारपद भूषवत असताना ऋषभ पंतच्या डाव्या बाजूला दुखापत झाली. न्यूझीलंड दौऱ्यातील ‘इंडिया ए’ संघाचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीच्या अहवालावर अवलंबून होता. परंतु बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला सुरुवातीचे सामने विश्रांती घेण्याचा आणि वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्ला दिला आहे.

Loading...

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, ऋषभ पंत सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखेखाली असून त्याची दुखापत झपाट्याने सुधारत आहे. तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी तो पुनर्वसन उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृती सुधारणेचे आणि तंदुरुस्तीचे योग्य मूल्यांकन केल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातील इंडिया ‘अ’ संघाच्या तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल. ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर निवड समितीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या झारखंडच्या कुमार कुशाग्र या युवा यष्टीरक्षक-फलंदाजावर विश्वास दाखवला आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी कुशाग्रला राखीव यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. देशांतर्गत लाल चेंडू आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपल्या आक्रमक दृष्टिकोनासाठी आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुशाग्रला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेला भारत ‘अ’ संघ खूपच मजबूत दिसत आहे.

युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघात यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या प्रस्थापित आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे. ज्यामुळे फलंदाजीची फळी लक्षणीयरीत्या मजबूत झाली आहे. गोलंदाजीच्या आक्रमणाबद्दल बोलायचे झाल्यास वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व आकाश दीप, मुकेश कुमार, अंशुल कंबोज, आकिब नबी आणि मुकेश चौधरी करतील, तर फिरकी गोलंदाजी विभागात मानव सुथार आणि वॉशिंग्टन सुंदर महत्त्वाची भूमिका बजावतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us