AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तूने जिंदगी में आके, जिंदगी बदल दी…’ रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट!

भारताचा आक्रमक सलामीवीर तसंच मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माने आपल्या वयाची 33 वर्ष पूर्ण करुन 34 व्या वर्षात पदार्पण केलं. रितिकाने खास अंदाजात रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Ritika sajdeh Romantic Post For Rohit Sharma Birthday)

'तूने जिंदगी में आके, जिंदगी बदल दी...' रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट!
रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट...
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 01, 2021 | 8:11 AM
Share

मुंबई : भारताचा आक्रमक सलामीवीर तसंच मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या वयाची 33 वर्ष पूर्ण करुन 34 व्या वर्षात पदार्पण केलं. 30 एप्रिल रोजी त्याने आपला वाढदिवस मुंबई इंडियन्समधील संघ सहकाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी त्याची पत्नी रितिकादेखील (Ritika Sajdeh) उपस्थित होती. रितिकाने खास अंदाजात रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितिकाच्या शुभेच्छा देण्याच्या अंदाजाने रोहित शर्माला देखील आनंद झाला असेल. (Ritika Sajdeh Romantic Post For Rohit Sharma Birthday)

रितिकाची रोहितसाठी खास रोमँटिक पोस्ट

रितिकाने रोहितच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोच्या माध्यमातून तिने रोहितला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुलगी समायरासोबत रोहितचा फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना तिने पोस्टमधून बोलून दाखवल्या आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा रो… तू माझ्या आयुष्यात असणं ही माझ्यासाठी सर्वांत खास गोष्ट आहे. तू माझ्यासोबत असण्याने हे जग अधिक सुंदर आहे, अशा शब्दात रितिकाने आपल्या मनातील भावना रोहितच्या वाढदिवशी एका रोमँटिक पोस्टमधून बोलून दाखवल्या आहेत. एकंदरित ‘हमराज’ या हिंदी चित्रपटातील अलका याग्निक यांनी गायलेल्या ‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी…’ या गाण्यातील भावना आणि रितिकाच्या भावना मिळत्याजुळत्या आहेत किंबहुना सारख्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

रितिका रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत

रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. रोहतची पहिली गर्लफ्रेंड सोफिया हयातबरोबरच्या ब्रेकअप नंतर रोहितची रितिका बरोबर ओळख झाली. पुढे खूप चांगली मैत्री होऊन त्या मैत्रीचं रुपांर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी 2015 साली लग्न केलं. ज्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. समायरा ही रोहित-रितिकाची क्युट मुलगी आहे. अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते.

मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा मुंबईने जिंकले आहे. मुंबईनंतर सीएसकेने एमएस धोनीच्या नेतृत्वात 3 वेळा आयपीएल करंडक जिंकला आहे.

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

अश्विनच्या कुटुंबावर ‘नको ती वेळ’, परिवारातल्या तब्बल एवढ्या लोकांना कोरोनाची लागण, पत्नी प्रीतीने सांगितली आपबिती

IPL 2021 | अवघ्या 7 चेंडूत विराट-डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलचं काम तमाम, कोण आहे हरप्रीत?

Follow Us
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे